Twin Tower Saam Tv
देश विदेश

Twin Tower : अखेर नोएडा मधील बहुचर्चित ट्विन टॉवर पत्त्यासारखा कोसळला, पाहा व्हिडिओ

ही इमारत नोएडाच्या सेक्टर-९३ मध्ये होती.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) नोएडामध्ये सध्या असलेला सुपरटेकचा 'ट्विन टॉवर' अल्पावधीतच पाडला आहे. ही इमारत नोएडाच्या सेक्टर-९३ मध्ये होती. यात सुमारे ८५० फ्लॅट्स होते. वर्षानुवर्षे मेहनत आणि कोट्यवधी रुपयांचा खर्च केल्यानंतर बांधलेली ही इमारत काही सेकंदात कोसळली आहे. या दोन्ही इमारतींची उंची सुमारे १०० मीटर होती.

एडिफाय इंजिनीअरिंगला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचे काम देण्यात आले होते. हे ट्विन टॉवर पाडण्यासाठी ४६ जणांची टीम काम करत होती. ही टीम दररोज सुमारे १२ तास स्फोटकं लावण्याचं काम करत होती. स्फोटकांच्या मदतीनं अवघ्या तीन मिनिटांत एपेक्स आणि सायन नावाचे दोन टॉवर जमीनदोस्त झाले आहेत.

बांधकाम पाडण्यासाठी ३५०० किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला आहे. यासंदर्भात सुरक्षा व्यवस्थाही मजबूत करण्यात आली आहे. जवळपासचे निवासी भाग रिकामे करण्यात आले आहेत. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

२०१२ मध्ये रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशनने अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. अनेक दिवस सुनावणी झाल्यानंतर २०१४ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने दोन्ही टॉवर पाडण्याचे आदेश दिले होते. यानंतर नोएडा प्राधिकरण आणि सुपरटेक या दोन्ही कंपन्यांनी उच्च न्यायालयाच्या या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यानंतर अधिक तपास केला, तर सरकारी अधिकाऱ्यांच्या संगनमताची बाब समोर आली. त्यावर कारवाईही झाली.

पाहा व्हिडिओ

यानंतर गेल्या वर्षी ३१ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला होता. आणि ट्विन टॉवर्स पाडण्याचे अंतिम आदेश जारी केले. दोन्ही टॉवर इमारतीचे नियम आणि अग्निसुरक्षेचे नियम लक्षात न ठेवता बांधण्यात आल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. आज अखेर ही इमारत पाडण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

Maharashtra News Live Update: आंदोलनात सहभागी झाल्याने शिक्षकांचा एक दिवसाची पगार कापणार

Weather Update: पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; राज्यात मान्सून कमकुवत का झाला? हवामान विभागानं कारण सांगितलं

SCROLL FOR NEXT