bride shocking allegation  Saam tv
देश विदेश

लग्नाच्या पहिल्या रात्री जवळ गेले, पण...; नवऱ्याचं टॉप सिक्रेट कळताच बायकोची पायाखालची जमीन सरकली

bride shocking allegation : नवऱ्याचं टॉप सिक्रेट कळालं. त्यानंतर बायकोची पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर नवरीने केलेल्या आरोपाने कानपुरात चर्चांना उधाण आलं आहे.

Vishal Gangurde

कानपूरच्या महिलेचे नवऱ्यावर गंभीर आरोप

लग्नानंतर पती नपुंसक असल्याचा पत्नीचा गंभीर आरोप

नवरीच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी खर्च केले ३८ लाख रुपये

उत्तर प्रदेशच्या कानपूरच्या किशोरनगरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न झालेल्या महिलेने पती आणि सासरच्या मंडळीवर गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. महिलेच्या गंभीर आरोपानंतर किशोरनगरमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीचं २५ एप्रिल २०२५ रोजी हमीरपूरचे रहिवासी तरुणासोबत लग्न झालं. तरुणीच्या वडिलांनी लग्न, हॉटेल, कॅटरिंग आणि इतर खर्चावर तब्बल ३८ लाख रुपये खर्च केले. मुलगी सुखात राहील, अशी मुलीच्या कुटुंबीयांना अपेक्षा होती.परंतु लग्नानंतर वेगळाच प्रकार समोर आला.

बायकोने आरोप करताना म्हटलं की,'मी लग्नाच्य पहिल्या रात्री नवऱ्याजवळ गेले. परंतु तो टाळू लागला. मी अनेकवेळा प्रयत्न केले. काही दिवसांनंतर पती नपुंसक असल्याचे समोर आलं. माझी फसवणूक झाली आहे'.

पीडित तरुणाच्या आरोपानुसार, तरुणी २६ एप्रिल रोजी सासरी आली. लग्नानंतर चार दिवसांमध्ये नवऱ्याचं वागणे विचित्र वाटले. नवरा तिच्यापासून दूर दूर राहू लागला. त्याने लग्नानंतर रात्र एकत्र घालवली नाही. तरुणीने अनेकदा प्रयत्न केले. परंतु पतीने अनेकदा टाळाटाळ केली.

काही दिवसांनी तरुणी माहेरी आली. काही दिवसांनी नवऱ्याने पत्नीला नोएडामध्ये काकाच्या घरात ठेवलं. तरुणीने पुढे आरोप केला आहे की, 'काकाच्या घरात एक महिना सोबत राहूनही शारीरिक संबंध ठेवले नाहीत. त्याचवेळी नवरा नंपुसक असल्याचे समजले'.

तरुणीने सासरा आणि मोठ्या भावाशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी नवऱ्यावर उपचार करण्याचे आश्वासन दिलं. तिला सासरच्या मंडळीने सांगितलं की, 'तुम्ही आताही नवरा-बायकोसारखं राहा. मुलावर उपचार करू. त्याचा संपूर्ण खर्च उचलू'. परंतु तरुणीने यावर आक्षेप घेतला. त्यानंतर सासरच्या मंडळीने धमकी दिल्याचा आरोप तरुणीने केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात टिपू सुलतान झिंदाबादच्या घोषणा, मास मूव्हमेंट संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी

Australia Eliminated : टी २० वर्ल्डकपमध्ये सर्वात मोठा उलटफेर; बलाढ्य ऑस्ट्रेलिया स्पर्धेतूनच बाद, झिम्बाब्वेची सुपर ८ मध्ये एन्ट्री

Ear Care: इअरफोन वापरताना तुम्ही 'ही' चुकी करत आहात का? वाचा तज्ज्ञांचा सल्ला, दिला धोक्याचा इशारा

Tipu Sultan Remark: हर्षवर्धन सपकाळांकडून शिवप्रेमींची दिलगिरी; म्हणाले, 'हा भाजपचा खोडसाळपणा'|Video

बीड हत्याकांडानं हादरलं! सोशल मीडियावर टशन; स्टेट्सवरून राडा, २० वर्षांच्या तरुणाच्या हत्येनं खळबळ

SCROLL FOR NEXT