Who is Narayan Sakar Hari Bhole Baba eSakal
देश विदेश

Hathras Stampede: भोले बाबांच्या सत्संगात चेंगराचेंगरी; कोण आहेत नारायण साकार हरी भोले बाबा

Who is Narayan Sakar Hari Bhole Baba: नारायण साकार हरी या संताच्या सत्संगात मंगळवारी चेंगराचेंगरी झाली. पश्चिम उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांचे कार्यक्रम आयोजित केले जातात.

Bharat Jadhav

उत्तर प्रदेशातील हाथरस-एटा सीमेवर सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ५० ते ६० जणांचा मृत्यू झालाय. मिळालेल्या माहितीनुसार, हा सत्संग संत भोले बाबांचा होता. हाथरस एटा सीमेजवळील रतीभानपूर येथे संत भोले बाबांचे प्रवचन होते, हे ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. सत्संगाच्या मंडपात भयंकर आर्द्रता आणि उकाडा जाणवत होता. त्यामुळे लोक बाहेर पडू लागले होते. उकाड्यामुळे भाविक बेशुद्ध होत होते, ते पाहून भाविक घाबरून घाईने मंडपाबाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी चेंगराचेंगरी झाली.

दरम्यान हा सत्संग कोणत्या बाबा होता, याची माहिती इंटरनेटवर विचारली जात आहे. भोले बाबा नारायण साकार हरी या नावाने ओळखले जाणारे संत हे पश्चिम यूपीमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. थ्री पीस सूट घालून ते भक्तांना मोह माया सोडत भाविकांना भगवंताच्या भक्तीत लीन होण्याचे ज्ञान देत असतात. नारायण हरी यांचा राजकारणाशीही संबंध आहे.

अनेकवेळा ते यूपीतील अनेक बडे नेते त्यांच्या मंचावर दिसले आहेत. यामध्ये समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या नावाचाही समावेश आहे. दरम्यान, या अपघाताच्या चौकशीसाठी एडीजी आग्रा आणि आयुक्त अलिगढ यांची समिती स्थापन करण्यात आलीय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हातरस जिल्ह्यातील दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केलाय. तसेच जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. जखमींना तात्काळ रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर योग्य ते उपचार करावेत आणि घटनास्थळी मदतकार्याला गती द्यावी, अशा सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्यात.

मिळालेल्या माहितीनुसार, कोतवाली येथील एका गावात भोलेबाबा यांचं प्रवचन होतं. या कार्यक्रमासाठी साधारण २० हजार भाविक आले होते. या गर्दीमुळे भाविक त्रासले होते. गर्दी आणि उन्हामुळे लोक बेहोश होऊन खाली पडले, हे पाहून लोक घाबरले आणि मंडपाच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागले. त्याचदरम्यान चेंगराचेंगरी झाली. जेव्हा लोक जमिनीवर पडले तेव्हा इतर लोक त्यांना चिरडून पुढे जात होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाने शेकडो गंभीर लोकांना रुग्णालयात दाखल केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चाकण MIDCत वाहतूक कोंडी का होते? नागरिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांचा मोर्चा

Mumbai News: १३व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; चेंबूरमधील घटना

Rohit Pawar: 'आईला कशाला मध्ये आणता'! माझ्याशी लढायची भाजपमध्ये ताकद नाही का? रोहित पवार संतापले

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

SCROLL FOR NEXT