uttar pradesh hardoi crime news Saam Tv
देश विदेश

बायकोला इन्स्टा रिल्सचं वेड, नवऱ्याची सटकली; कुऱ्हाडीनं वार करत जागीच संपवलंं, लेकीलाही सोडलं नाही

Reels Addiction Turns Deadly: उत्तरप्रदेशातून धक्कादायक घटना उघडकीस. रिल्सवरून पतीनं पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीनं वार केले. पोलिसांकडून तपास सुरू.

Bhagyashree Kamble

  • उत्तर प्रदेशातील हरदोईत इन्स्टा रिल्सवरून पतीनं पत्नीची कुऱ्हाडीनं हत्या केली.

  • हल्ल्यात १३ वर्षीय मुलगी गंभीर जखमी, लखनऊमध्ये उपचार सुरू.

  • मृत पत्नीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला गेला.

  • पोलिस तपास सुरू असून आरोपी नवऱ्याला ताब्यात घेण्यात आलं.

उत्तर प्रदेशातील हरदोई येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. बायकोला रिल्सचं वेड असल्याकारणामुळे संतापलेल्या नवऱ्यानं बायकोवर कुऱ्हाडीनं वार केले. या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर, मुलगी गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

ही घटना अत्रौली परिसरात घडली आहे. रामसनेही शेती करून घर चालवतात. त्याला व्यसन देखील आहे. आरोपीचे १५ वर्षांपूर्वी बिहारमध्ये राहणाऱ्या वेदनाशी झाले होते. दोघांना एकूण पाच मुले आहेत. आरोपीच्या पत्नीला रिलचा नाद होता. आरोपीची बायको रिल तयार करून सोशल मीडियावर शेअर कराययी. रामसनेहीला बायकोचे हे रिलचे वेड आवडत नव्हते.

दोघांमध्ये इन्स्टा रिल्समुळे प्रचंड भांडणं होत. बुधवारी रात्री त्याची पत्नी वेदना तिच्या पाच मुलांसह खाटेवर झोपली होती. रात्री रामसनेही आणि त्याची पत्नी वेदना यांच्या व्हिडिओ बनवण्यावरून वाद झाला होता. त्यानंतर वेदना मुलांसह खाटेवर झोपायला गेली. मात्र, नवऱ्याला राग अनावर झाला. रामसनेहीनं वेदना झोपेत असताना तिच्या मानेवर कुऱ्हाडीनं वार केले.

या हल्ल्यात वेदना गंभीर जखमी झाली. १३ वर्षांच्या चिमुकलीनं आईला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र,वडिलांनी मुलीवरही हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. रात्री ११ वाजेच्या दरम्यान, पोलिसांना याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चौकशी केली. तसेच जखमींना तातडीने स्थानिक रूग्णालयात उपचारासाठी पाठवले.

डॉक्टरांनी वेदनाला मृत घोषित केले. मुलगी रेश्माची प्रकृती गंभीर असून,तिच्यावर लखनऊमधील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले असून, आरोपी पतीलाही पोलिसांकडून तपास सुरू आहे. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cake: गोडाची आवड ठरते घातक, केकचे दुष्परिणाम जाणून घ्या

Navi Mumbai Video : पोलीस अधिकाऱ्यानं रीलच्या नादात काय केलं बघा? VIDEO

Maharashtra Live News Update: नागपुरात जोरदार पावसाला सुरुवात

Shrileela Saree Collection: श्रीलीलाच्या ट्रेंडी आणि क्लासिक साड्यांचे कलेक्शन पाहिलेत का? तुम्हीही करु शकता लूक कॉपी

Cotton One Piece Dresses: या सणासुदीला 'हे' कम्फर्टेबल कॉटन वन पीस ड्रेस करा ट्राय, तुम्हाही दिसाल एलिगंट

SCROLL FOR NEXT