YOGI GOVERNMENT ANNOUNCES WORK FROM HOME, CUTS MINISTERIAL CONVOYS AFTER PM MODI’S APPEAL saam tv
देश विदेश

दोन दिवस Work From Home, मंत्र्यांच्या ताफ्यात कपात; पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय

State Government Big Decision: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला पाठिंबा देत मोठा निर्णय घेतला आहे. याशिवाय त्यांनीही राज्यातील नागरिकांना इंधनाची बचत करण्याचे आणि सोन्याची अनावश्यक खरेदी टाळण्याचे आवाहन केले आहे.

Bharat Jadhav

  • उत्तर प्रदेश सरकारने दोन दिवस वर्क फ्रॉम होमचा निर्णय घेतला.

  • मंत्र्यांच्या ताफ्यात कपात करून इंधन बचतीवर भर.

  • पीएम मोदींच्या आवाहनाला योगी सरकारचा पाठिंबा.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला पाठिंबा दिला आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाचे समर्थन करत मुख्यमंत्री योगींनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी राज्यातील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन वापर कमी करण्याच्या आणि सोन्याची अनावश्यक खरेदी टाळण्याच्या आवाहनात सामील होण्याचे आवाहन केले आहे.

यासह मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव, पोलीस महासंचालक (डीजीपी) आणि सर्व विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव व प्रधान सचिव यांच्यासोबत बैठक घेऊन अनेक महत्त्वाचे निर्देश दिलेत. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या तात्काळ ५० टक्क्यांनी कमी करण्याचे निर्देश देण्यात आले.मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या तात्काळ ५० टक्क्यांनी कमी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मेट्रो, पीएनजी आणि रोडवेज बसेसच्या वापरावर भर

बहुसंख्य शासकीय बैठका, चर्चासत्रे, परिषदा आणि कार्यशाळा व्हर्च्युअल पद्धतीने घेण्यावर भर देण्यात आला. राज्य सरकार 'वर्क-फ्रॉम-होम' संस्कृतीला प्रोत्साहन देणार आहे. यासह मोठ्या संस्थांना आठवड्यातून दोन दिवस घरून काम लागू करण्यासाठी एक सूचना जारी करावी अशा सूचना मु्ख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. यासह मुख्यमंत्र्यांनी मेट्रो, पीएनजी, सार्वजनिक वाहतूक, रोडवेज बसेस, कारपूलिंग, सायकलिंग आणि ईव्ही (इलेक्ट्रिक वाहने) यांचा वाढीव वापर करण्यावर विशेष भर द्यावा असेही सांगितले.

'नो व्हीकल डे ' पाळण्याचे आवाहन

मंत्री, खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधींना आठवड्यातून एकदा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून 'नो व्हीकल डे' पाळण्याचे आवाहन केले आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये स्कूल बसेसला प्रोत्साहन द्यावे आणि गरज भासल्यास रोडवेज बसेसचीही भर घालावी. गर्दीच्या वेळी इंधनाचा वापर कमी करण्यासाठी कार्यालयांच्या वेळा विभागून घ्याव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री योगी यांनी दिल्या आहेत.

ऊर्जा संवर्धनावर भर देत, मुख्यमंत्र्यांनी शासकीय आणि खाजगी संस्थांना विजेचा अनावश्यक वापर कमी करण्याचे निर्देश दिले. व्यावसायिक आस्थापना आणि संकुलांना रात्री १० नंतर सजावटीच्या दिव्यांचा वापर कमीत कमी करण्याचे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT