Mother Buried Near River After Sons Denial Saam
देश विदेश

'घरी लग्न आहे, आईचा मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवा', लेकाच्या निर्णयामुळे वडील ढसाढसा रडले, शेवटी आईचं शव मातीत पुरलं

Mother Buried Near River After Sons Denial: उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये मुलानं आईचा मृतदेह घरी आणण्यास नकार दिला. घरात लग्न असल्यानं नकार दिला.

Bhagyashree Kamble

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधून एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. घरी लग्न कार्य असल्यामुळे मोठ्या मुलानं आईचे पार्थिव घरी आणण्यास नकार दिला आहे. तसेच आईचे पार्थिव वडिलांना फ्रीजरमध्ये ठेवण्यास सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, मोठ्या मुलाच्या लेकाचं घरी लग्न कार्य होते. आईचे निधन झाल्यानंतर त्यानं आईचे मृतदेह घरी आणण्यास नकार दिला. त्यानंतर आईचा मृतदेह घाटाच्या काठावर पुरण्यात आले. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

कैंपियरगंज क्षेत्रातील भरोहियां ग्रामपंचायतीच्या हद्दीत हे जोडपे राहत होते. पती भुआल गुप्ता, पत्नी शोभा गुप्ता आणि तीन मुले असा परिवार होता. भुआल गुप्ता म्हणाले की, 'वर्षभरापूर्वी मोठ्या मुलानं घराबाहेर हाकलून लावले होते. नंतर मी आणि माझ्या पत्नीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रत्यक्षदर्शींनी त्यांना असे करण्यापासून रोखले'.

'अयोध्येतून आम्ही मथुराला गेलो. नंतर जौनपूरमध्ये एका वृद्धाश्रमात आश्रय मिळालं. १९ नोव्हेंबरला पत्नीची प्रकृती बिघडली. पत्नीचा जागीच मृत्यू झाला. याबाबत धाकट्या मुलाला माहिती देण्यात आली. मोठ्या मुलानं आईचा मृतदेह घरी आणण्यास नकार दिला. घरात लेकाचं लग्न आहे, आईचा मृतदेग फ्रीजरमध्ये ठेवा, अशी त्यानं विनंती केली', अशी माहिती मृत महिलेच्या पतीनं दिली.

यानंतर गावकरी आणि नातेवाईकांनी भूआल गुप्ता यांना शोभा देवीचा मृतदेह घाटाच्या जवळील मातीत दफन करण्यास सांगितले. त्यानंतर शोभा देवी यांचा मृतदेह घाटाजवळ दफन करण्यात आले. यानंतर भूआल गुप्ता यांना रडू अनावर झाले. या घटनेची संपू्र्ण गावात चर्चा सुरू आहे. काही लोकांनी शोभा देवीच्या शेवटच्या क्षणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. यावर नेटकऱ्यांनी तीव्र उमटल्या दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate: खरेदीची सुवर्णसंधी! आठवडाभरात सोनं ७००० तर चांदी १४००० रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

Lemon storage tips: लिंबू सुकू नयेत म्हणून ‘या’ पद्धतीने करा स्टोअर, महिनाभर राहतील फ्रेश

Maharashtra News Live Update: ‘मुलुंडचा आमदार चोरीला गेला’; काँग्रेसचे राकेश शेट्टी यांची पोलिसांत तक्रार

New Rule : 1 ऑक्टोबरपासून सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम! ATM ते LPG पर्यंत 5 नवे नियम लागू, वाचा सविस्तर

Car tyre replacement: किती किलोमीटर्सनंतर कारचे टायर बदलले पाहिजेत?

SCROLL FOR NEXT