engineer dies after hair transplant Saam tv
देश विदेश

Shocking News : हेअर ट्रान्सप्लांट करताना आणखी एका इंजिनीअरचा मृत्यू; त्याच डॉक्टर तरुणीकडून भयंकर उपचार

engineer dies after hair transplant : हेअर ट्रान्सप्लांट करताना आणखी एका इंजिनीअरचा मृत्यू झालाय. त्याच डॉक्टर तरुणीने भयंकर उपचार केल्याचे समोर आलं आहे.

Vishal Gangurde

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये हेअर ट्रान्सप्लांट करताना आणखी एका इंजिनीअरचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पनकीतील इंजिनीअर तरुणाचा हेअर ट्रान्सप्लांट करताना मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी नातेवाईकांवर विरोधात गुन्हा नोंदवला होता. या प्रकारानंतर क्लिनिक बंद करून महिला डॉक्टर पळाली होती. पळालेली महिला डॉक्टर अनुष्काचा आणखी एक प्रताप उघडकीस आला आहे. हेअर ट्रान्सप्लांट केलेल्या आणखी एका इंजिनीअरचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

दोन्ही इंजिनीअरची थेरेपी डॉक्टर अनुष्काने केली होती. इंजिनीअरचा मृत्यू झाल्यानंतर पळालेल्या डॉक्टर अनुष्काचा शोध पोलिसांना लागला नाही. पनकीनंतर फर्रुखाबादच्या इंजिनीअरचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नोव्हेंबर महिन्यात देखील डॉक्टर अनुष्काच्या उपचारामुळे एकाचा मृत्यू झाला होता. पनकीतील इंजिनीअरचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.

नेमकं काय घडलं?

३२ वर्षीय मयंक कटियारने कानपूरच्या प्राणवीर सिंह इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये बीटेक केल्यानंतर नोकरी करायला सुरुवात केली होती. मयंक कानपूरमध्ये व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत होता. मयंक १८ नोव्हेंबर रोजी हेअर ट्रान्सप्लांट करण्यासाठी केशवपूर येथील इंपायर क्लिनिकच्या डॉक्टर अनुष्का तिवारीकडे गेला होता. अनुष्काने सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत थेरेपी केली. हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर मयंकला घेऊन त्याचा छोटा मुलगा कुशाग्र फर्रुखाबाद येथील घरी घेऊन गेला.

थेरेपी केल्यानंतर काही तासांनंतर रात्री १२ वाजता मयंकला त्रास होऊ लागला. डॉक्टर अनुष्काने त्याला इंजेक्शन घेण्यास सांगितलं. इंजेक्शननंतरही बरं वाटलं नाही, डोक्यावरील पट्टी सैल करण्याचा सल्ला दिला. पट्टी सैल करूनही त्रास होत असल्यास दुसरं इंजेक्शन घेण्यास सांगितलं. मात्र, इंजेक्शनमुळे इंजिनीअरचा चेहरा सुजला. त्यानंतर काळा पडण्यास सुरुवात झाली. इंजेक्शनमुळे सकाळपर्यंत संपूर्ण चेहरा सुजला होता.

याचदरम्यान, मयंकची छाती दुखू लागल्याने अनुष्काने फर्रुखाबादमधील हृदयाच्या डॉक्टरकडे जाण्यास सांगितलं. डॉक्टरने हृदयाशी संबंधित त्रास नसल्याचं म्हटलं. त्या डॉक्टरने पुन्हा डॉक्टर अनुष्काकडे जाण्यास सांगितलं. डॉक्टर अनुष्काकडे जाण्याची तयारी करत असताना इंजिनीअर मयंकने जीव सोडला. मयंकच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा, मुंबई-रायगडला रेड अलर्ट

Breaking : मुंबईत अतिमुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली, दोघांचा मृत्यू, 4 गंभीर जखमी

Saturday Horoscope : दहीहंडीचा उत्सव या राशींच्या लोकांसाठी खास ठरणार, वाचा शनिवारचं राशीभविष्य

Nasa : 2030 पर्यंत चंद्रावर कायमस्वरूपी मानवी वस्ती, नासा चंद्रावर उभारणार अणुभट्टी

US Blast : पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी खळबळ, अमेरिकेत मोठा स्फोट, न्यूयॉर्क शहरात गोंधळ

SCROLL FOR NEXT