Crime News  Saam Tv
देश विदेश

Shocking News: १८ व्हिडिओ कॉल, न्यूड फोटो अन् VIDEOची मागणी; नकार देताच तरूणानं स्वत:ला संपवलं

Youth Killed himself After rejection: "दारूच्या नशेत तरुणाने व्हिडिओ कॉलवर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. प्रेमात मिळालेल्या अपयशामुळे त्याने उचललं टोकाचं पाऊल.

Bhagyashree Kamble

विवाहित तरूणी लग्न करण्यास नकार देत असल्यामुळे तरूणाने टोकाचे पाऊल उचलले. दारूच्या नशेत त्याने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात त्या युवकाचा मृत्यू झाला. सुरूवातीला मृत तरूणाच्या कुटुंबाने आत्महत्या नसून हत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला. मात्र, पोलिसांच्या फॉरेन्सिक तपास आणि कॉल डिटेल्सच्या विश्लेषणातून हे प्रकरण उघडकीस झालं. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातील कुंवर गावात घडली. या घटनेची माहिती परिसरात पसरताच खळबळ उडाली आहे.

अमित कुमार असे मृत तरूणाचे नाव आहे. ७ जून रोजी अमित आपल्या मित्रांसोबत शेतात दारू पित होता. रात्री १० च्या सुमारास त्याच्या मित्राने कुटुंबीयांना कळवलं की अमितची प्रकृती बिघडली आहे. कुटुंबीयांनी घटनास्थळी पोहोचल्यावर अमित मृतावस्थेत आढळला. त्याच्या उजव्या डोळ्याजवळ गोळी लागलेली होती, मोबाईल फोन त्याच्या पोटावर होता आणि जवळच देशी बनावटीचं पिस्तूल सापडलं.

कॉल डिटेल्सच्या तपासणीत निष्पन्न झालं की अमितने घटनेच्या रात्री एका महिलेला १८ वेळा कॉल केला होता. ती महिला उन्नाव जिल्ह्यातील असून तिच्या म्हणण्यानुसार, अमितने व्हिडिओ कॉलवर लग्नासाठी दबाव आणला होता. तिने नकार दिल्यावर अमितने हवेत गोळी झाडली आणि नंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

महिलेच्या म्हणण्यानुसार, तिने मेहुण्याच्या नावाने फेक अकाऊंट तयार केलं होतं. त्या फेक अकाऊंटवरून ती अमितसोबत चॅट करत होती. यादरम्यान त्यांची ओळख वाढली. दोघांमध्ये रोज चॅटिंग सुरू होतं. अमित नेहमी अश्लील बोलायचा. न्यूड फोटो आणि व्हिडिओची मागणी करायचा, पिस्तूल दाखवायचा अशी माहिती महिलेनं दिली. याच गोष्टीला कंटाळून तिने त्याच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार दिला.

महिलेनं नकार दिल्यानंतर संतापून अमित नेहमी तिला आत्महत्येची धमकी दिली. यानंतर त्याने दारूच्या नशेत स्वत:ला संपवलं. पोलिसांनी घटनास्थळावरून गोळ्या, काडतुसे, मोबाईल आणि पिस्तूल जप्त केलं आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षक डॉ. ब्रजेश सिंह यांनी सांगितले की, फॉरेन्सिक अहवालानंतर संपूर्ण परिस्थिती स्पष्ट होईल. पिस्तुलावरचे बोटांचे ठसे आणि इतर वैज्ञानिक पुरावे तपासले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Flat : 'म्हाडाचे घर' सर्वसामान्यांसाठी 'लुटीचा अड्डा'? कुणी केला गंभीर आरोप, वाचा

L Ganesan death : मृत्यूशी झुंज अपयशी ठरली; राज्यपाल एल. गणेशन यांचं निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Woman Threatening: 'तुझे कपडे उतरवून तुला...';पिंक टी-शर्टवाल्या बाईचा भररस्त्यात राडा,व्हिडिओ व्हायरल

Meat Ban Row : दाबा लोकशाहीचं बटन, दाबून खा मच्छी मटण

Human Washing Machine : आता वॉशिंग मशिन माणुसही धुणार; 15 मिनिटांत तुम्ही व्हाल ताजेतवाने, वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT