देश विदेश

Shocking: अर्ध्या रात्री कांड झालं! नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर ब्लेडनं केले वार, बायको इतकी का संतापली?

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात पती-पत्नीतील वादात पत्नीने रात्री उशिरा संतप्त होऊन पतीच्या गुप्तांगावर ब्लेडने हल्ला केला. जखमी पतीची प्रकृती गंभीर असून अलीगढ मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत.

Dhanshri Shintre

  • पत्नी-पत्नीमधील वादामुळे संभल जिल्ह्यात हिंसक घटना घडली.

  • संतापलेल्या पत्नीने पतीच्या गुप्तांगावर ब्लेडने वार करून गंभीर जखमी केले.

  • जखमीला अलीगढ येथील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.

  • पोलिसांनी आरोपी पत्नीसाठी शोधमोहीम सुरू केली असून तपास सुरू आहे.

उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. नवरा-बायकोमधील वादाचे रुपांतर अगदी मारहाणापर्यंत पोहोचले. गुन्नौर पोलीस स्टेशन परिसरातील या प्रकरणात संतप्त झालेल्या पत्नीने आपल्या नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर ब्लेडने वार करून त्याला गंभीर जखमी केले. जखमी तरुण ओरडू लागल्यावर कुटुंबीय घटनास्थळी धावत आले. त्यांनी रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या पतीला तात्काळ रुग्णालयात दाखल केले.

घटनास्थळावरील असलेल्यांच्या म्हणण्यानुसार, पीडिताचे नाव राजू असून तो गुन्नौर परिसरातील रहिवासी आहे. काही वर्षांपूर्वी त्याचे लग्न बदौन जिल्ह्यातील मिर्झापूर गावातील एका महिलेशी झाले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उशिरा त्या दोघांमध्ये वाद झाला आणि त्या वादाचे रूपांतर हिंसक मारहाणीत झाले. संतापाच्या भरात पत्नीने ब्लेडने हल्ला केला. ज्यामुळे राजू गंभीर जखमी झाला.

जखमी अवस्थेत राजूला प्रथम गुन्नौर येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. जिथे प्राथमिक उपचारानंतर त्याला अलीगढ येथील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले. डॉक्टरांनी त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले आहे.

राजूच्या कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांना सांगितले की लग्नानंतरपासूनच या जोडप्यात सतत वाद आणि मतभेद होत होते. अनेकदा घरात वाद वाढत असत, परंतु यावेळी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि हल्ल्यापर्यंत पोहोचली. गुन्नौर पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक यांनी सांगितले की हे प्रकरण अतिशय गंभीर असून सध्या तपास सुरू आहे. आरोपी पत्नी घटनास्थळावरून फरार झाली आहे, आणि तिच्या शोधासाठी पोलिसांनी पथक तैनात केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय! जुलैपासून लागू होणार 'लँड टायटलिंग ॲक्ट'; आता प्रत्येक फ्लॅटचे मिळणार 'मालमत्ता कार्ड'

Ladki Bahin Yojana: मे महिन्याची १० तारीख उजाडली! लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३००० की ४५०० रुपये येणार? पाहा सविस्तर अपडेट

Pune Crime: पुणे हादरले! नवऱ्यासोबत कडाक्याचे भांडण, महिलेने ८ व्या मजल्यावरून मारली उडी

Maharashtra Farmer Loan : कर्जमाफीचा मोठा निर्णय! ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार; सहकार विभागाची सरकारला माहिती

SCROLL FOR NEXT