Uttar Pradesh Crime  Saam Tv
देश विदेश

Uttar Pradesh Crime News: बदनामीच्या भितीने भयंकर घडलं! आधी शिक्षक लेकीची गोळ्या झाडून हत्या अन् स्वतःही संपवले आयुष्य

Crime News: दोघेही शिक्षक असलेल्या बापलेकीच्या किरकोळ वादातून घडलेल्या भयंकर घटनेने परिसरात खळबळ माजली आहे...

Gangappa Pujari

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यात रविवारी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील एका सरकारी शाळेतील ५५ वर्षीय शिक्षकाने आपल्याच मुलीची गोळ्या झाडून हत्या केल्याचे समोर आले आहे. मुलगीही सरकारी शाळेत शिक्षिका होती. यानंतर तिच्या वडिलांनीही स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या भयंकर घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

 प्रेमविवाहावरुन बापलेकिमध्ये वाद सुरु होता. पित्याचा मुलीच्या प्रेमाला विरोध होता, मात्र मुलगी आवडत्या मुलासोबत लग्न करण्याचा हट्ट करत होती, यावरुनच त्यांचा वाद विकोपाला गेल्याने ही घटना घडल्याचे समोर आले आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, मैनपुरी जिल्ह्यात राहणारे नरेंद्र सिंह यादव कासगंज स्थित एका कॉलेजमध्ये फिजिक्सचे प्रोफेसर म्हणून काम करत होते. तर मुलगी जुही मिर्झापूर प्रायमरी स्कूलमध्ये शिक्षिका होती. मुलीला आपल्या पसंतीच्या मुलाशी लग्न करायचे होते. मात्र वडिलांना हे मान्य नव्हते. पित्याने मुलीला खूप समजावले, मात्र ती ऐकायला तयार नव्हती. मुलीने स्पष्ट शब्दात वडिलांना सांगितले की, ‘मी सुशिक्षित आहे, स्वतःच्या पायावर उभी आहे, माझे निर्णय स्वतः घेऊ शकते’, हे ऐकताच वडिल संतापले.

त्यांनी रुममध्ये जावून आपली परवाना धारक बंदूक आणली आणि क्षणात मुलीवर गोळी झाडून हत्या केली. या हत्येनंतर त्यांनी स्वतःही गोळी झाडून घेत आपले जीवन संपवले. पती आणि मुलीला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून पत्नीने आरडाओरडा सुरु केला. महिलेचा आवाज ऐकून शेजारी धावत आले. शेजाऱ्यांनी तात्काळ दोघांना रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामे केले. याबाबतचा अधिक तपास पोलिस करत आहेत. मात्र बदनामीच्या भितीने पोटच्या लेकीची हत्या करुन वडिलांनीही जीवन संपवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या भयंकर घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT