Uttar Pradesh Crime News Saam Tv
देश विदेश

UP Crime News: वडील पोलीस ठाण्यात विनयभंगाची नोंदवत होते तक्रार, मुलीने घरात संपवलं जीवन; नेमकं काय आहे प्रकरण?

Uttar Pradesh Crime News: वडील पोलीस ठाण्यात विनयभंगाची नोंदवत होते तक्रार, मुलीने घरात संपवलं जीवन; नेमकं काय आहे प्रकरण?

Satish Kengar

Uttar Pradesh Crime New:

उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडामध्ये एका अल्पवयीन मुलीने राहत्या घरी आपलं जीवन संपवलं आहे. या घटनेने येथे खळबळ उडाली आहे. मुलीच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, त्यांच्या घरात घुसून एका व्यक्तीने त्यांच्या मुलीचा विनयभंग केला आणि अनेक दिवसांपासून तिचा छळ करत होता.

गुरुवारी मुलीचे वडील आणि भाऊ विनयभंगाची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता, मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून एका स्थानिक व्यक्तीकडून मुलीचा छळ केला जात होता. काल रात्री हा तरुण घरात घुसून तरुणीला तिचा फोन नंबर विचारत होता. एवढेच नाही तर त्याने या अल्पवयीन मुलीचा विनयभंगही केला.

या प्रकरणी जेवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 354 व्यतिरिक्त पोलिसांनी या प्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 'मुलीचा भाऊ आज पोलिस ठाण्यात आला होता आणि त्याने सांगितले की आरोपी जहांगीरपूरमध्ये राहतो. त्यानुसार रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आरोपी त्यांच्या घरी आला होता. त्याने बहिणीचा मोबाईल नंबर मागितला आणि तिचा विनयभंग केला. (Latest Marathi News)

अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, जेव्हा मुलीचा भाऊ आणि वडील पोलीस ठाण्यात बसून तक्रार दाखल करत होते, त्याचवेळी मुलीने घरात गळफास घेऊन जीवन संपवलं. मुलीने गळफास लावण्यासाठी कपड्याच्या हुकचा वापर केला होता. पोलिसांनी मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असून आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासाअंती असे समोर आले आहे की, मुलगी आणि आरोपी एकमेकांना आधीच ओळखत होते आणि आधीपासून एकमेकांच्या संपर्कात होते. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अजित पवारांविरोधात मोहोळ यांचा शड्डू; पवारांच्या वर्चस्वाला भाजपकडून सुरुंग?

Sachin Ghaiwal: 'मंत्रिमंडळ की गुंडांची टोळी'; सचिन घायवळच्या शस्त्रपरवान्यावरुन राऊतांचा प्रहार

निवडणूक आयोगाकडे 'ती' ऑडिओ क्लिप देऊ, बदमानी करू; ३० लाखाच्या खंडणीसाठी भाजप महिला नेत्याला धमकीचा फोन

Face Scrub: डेड स्कीन काढण्यासाठी घरीच बनवा 'हे' नैसर्गिक स्क्रब, त्वचा उजळेल

Cancer रुग्णांसाठी मोठी खूशखबर! कॅन्सरशी लढणार 'फ्रेंडली बॅक्टेरिया', कॅन्सरवरील बॅक्टेरियाचे संशोधन सुरु

SCROLL FOR NEXT