UP Crime News Saam tv
देश विदेश

UP Crime News: बापरे! आंघोळीवरुन झाला वाद अन् घडलं भयंकर; लहान भावाने मोठ्या भावाला संपवलं

हत्येनंतर 30 वर्षीय शादाब स्वतःच पोलीस ठाण्यात गेला होता आणि भावाच्या खुनाची कबुली दिली.

Gangappa Pujari

Uttar Pradesh Crime: उत्तरप्रदेशच्या फरिदाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुरादाबादमध्ये एका 33 वर्षीय गॅस वेल्डरची त्याच्याच लहान भावाने हत्या केली आहे. या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे घरातील बाथरुममध्ये अंघोळीला कोण जाणार? या शुल्लक कारणावरुन ही भयंकर घटना घडली. काय आहे हे संपूर्ण प्रकरण; जाणून घ्या सविस्तर... (Crime News In Marathi)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

याबाबत मृत झालेल्या तरुणाची पत्नी नसीम जहाँच्या म्हणण्यानुसार, त्यांची मुलगी खैरुल निशा सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आंघोळीसाठी जात असताना हा वाद सुरू झाला. त्यावेळी हल्लेखोर साजिदच्या पत्नीने तिला आधी बाथरूममध्ये जायचे असल्याने थांबण्यास सांगितले. शादाब आणि साजिद पहिल्या मजल्यावरून खाली आल्यावर प्रकरण आणखी बिघडले. यानंतर त्यांनी मुलगी आणि भावाच्या कुटुंबीयांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

तसेच याबद्दल पुढे बोलताना "आरोपीने आधी पती आणि मुलींना जीवे मारण्याची धमकी दिली. आणि माझ्या पतीवर तुटून पडले आणि लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मी सोडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी मला मारहाण केली. नंतर माझ्या पतीच्या भावाने माझ्या मुलींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्या घरातून बाहेर पडण्यात यशस्वी झाल्या आणि किरकोळ जखमी झाल्याचेही त्यांनी सांगितले. (Crime News)

दरम्यान, हत्येनंतर 30 वर्षीय शादाब स्वतःच पोलीस ठाण्यात गेला होता आणि भावाच्या खुनाची कबुली दिली. आपणच लाकडाच्या तुकड्याने फकीर हुसेनचा खून केल्याचा दावा शादाबने केला. सिव्हिल लाइन्स पोलिसांनी शादाबला ताब्यात घेत तपास सुरु केला आहे. या भयंकर घटनेची संपूर्ण पंचक्रोशीच चांगलीच चर्चा रंगली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT