Crime News Saam tv
देश विदेश

Crime News: मित्र झाले सैतान! नोकरीसाठी मुंबईत नेलं, मुलावर केला लैगिंक अत्याचार

Crime News in Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलासोबत लैगिंक अत्याचाराचा प्रकार घडलाय. तीन मुलांनी अल्पवयीन मुलाला नोकरी देण्याच्या बहाण्याने मुंबईत नेलं. नंतर लैगिंक अत्याचार केला.

Bhagyashree Kamble

उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलासोबत लैगिंक अत्याचाराचा प्रकार घडलाय. तीन मुलांनी अल्पवयीन मुलाला नोकरी देण्याच्या बहाण्याने मुंबईत नेलं. नंतर नशेचे औषध देत त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. तीन आरोपींमध्ये एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. या खळबळजनक घटनेनंतर देवरिया जिल्हा हादरला आहे.

यासंदर्भात पोलीस अधिक्षक विक्रांत वीर यांनी सांगितले की, पीडित मुलाचे वय १५ वर्ष आहे. त्याच्यावर लैगिंक अत्याचार करणारे आरोपींचे वय १५ ते १८ आहे. ही धक्कादायक घटना रूद्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ जानेवारीला घडली आहे. पीडितेवर स्थानिक रूग्णालयात उपचार सुरू असून, अल्पवयीन मुलाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

पीडित मुलाच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, एका आरोपीने मुलाला नोकरी देण्याच्या बहाण्याने मुंबईला नेले होते. तेथे आरोपीने त्याला नशेचं औषध दिलं, त्यामुळे तो बेशुद्ध होऊन पडला. बेशुद्ध पडल्यानंतर आरोपींनी त्याच्यावर लैगिंक अत्याचार केला. शुद्धीवर आल्यानंतर त्याने थेट आपले गाव गाठले. आरोपी देखील गावात आले. गावात आल्यानंतरही आरोपींनी पुन्हा अल्पवयीन मुलावर लैगिंक अत्याचार केला.

याप्रकरणानंतर पीडित मुलाची प्रकृती गंभीर असून, रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे. पीडित मुलाच्या कुटुंबाने रूद्रपूरचे एसएचओ रतन कुमार पांडे यांना या घटनेची माहिती दिली. मात्र, अनेकदा तक्रार दाखल करूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचं पीडित कुटुंबियांनी सांगितलं. ही बाब मीडियासमोर आल्यानंतर रूद्रपूर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र, अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा बस डेपोत उभ्या असलेल्या बसने घेतला पेट

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या नावे रमाई आवास योजनेत घोटाळा; फडणवीसांच्या नावाचं बनवलं चक्क आधार आणि रेशनकार्ड

रत्नागिरीला भूकंपाचा हादरा; घाबरून लोक घराबाहेर पळाले

LPG Crisis : 'गॅस' भडका शमवण्यासाठी ओतणार 'रॉकेल'; टंचाईवर काढला तोडगा, सरकारनं घेतले २ महत्वाचे निर्णय

मुंबईत 12 मार्च 1993 ची पुनरावृत्तीचा डाव? मुंबईत साखळी बॉम्बस्फोटांची धमकी?

SCROLL FOR NEXT