Uttar Pradesh Crime News Saam Tv
देश विदेश

विधवा वहिनीसोबत दीराचे अनैतिक संबध; पत्नीला संशय आला अन्...

तारादेवी असं मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे.

साम टिव्ही ब्युरो

बांदा : उत्तरप्रदेशच्या (Uttar Pradesh) बांदा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. इथे एका पतीने विधवा वहिनीसोबत मिळून आपल्याच पत्नीच्या अंगावर डिझेल टाकलं अन् तिला (Crime) पेटवून दिलं. या घटनेत पत्नी 80 टक्के भाजली. तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरू असताना तिची प्राणज्योत मावळली. (Uttar Pradesh Crime)

अंगावर काटा आणणारी ही घटना उत्तरप्रदेशच्या बांदा जिल्ह्यात गुरूवारी (14 जुलै) दुपारी घडली. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून महिलेने मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी संशयित आरोपी वहिनी आणि मृत महिलेच्या पतीला अटक केली आहे. तारादेवी असं मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तारादेवी हिचा पत्नी सुलेभानचे मोठ्या भावाची पत्नी अनुपमा सोबत अनैतिक संबध होते. सुलेभानच्या मोठ्या भावाचे वर्षभरापूर्वी निधन झाल्याने अनुपमा सुलेभान आणि तारादेवी यांच्यासोबतच राहत होती. मृत ताराबाईने मृत्युपूर्वी दिलेल्या जबाबात म्हटलं आहे की, माझे पती आणि जेठानी यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा मला संशय आला होता. (Uttar Pradesh Crime News)

'गुरूवारी रात्री (14 जुलै) मी पतीला अनुपमा यांच्या खोलीत जाताना बघितले. त्यानंतर मी खिडकीतून डोकावून बघितलं असता, दोघेही मला आक्षेपार्ह स्थितीत दिसून आले. मी आरडाओरड केल्यानंतर दोघांनीही मला पकडलं, मारहाण केली. त्यानंतर अंगावर डिझेल ओतून मला जिवंत जाळलं'. असं तारादेवी हिने मृत्युपूर्वी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं आहे.

दरम्यान, मृत तारादेवीच्या जबाबानंतर पोलिसांनी आरोपी पती सुलेभान आणि जेठानी अनुपमा दोघांनाही अटक केली आहे. तसेच ताराबाईचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या थरारक घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून पतीने आपल्याच पत्नीला जिवंत जाळल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri 2025: नवरात्रीत या घरामध्ये कन्यापूजन करू नये?

Eknath Shinde: शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही; एकनाथ शिंदे यांचं आश्वासन|VIDEO

Maharashtra Farmers : हातातोंडाशी आलेला घास पाण्यात, शेतातील कपाशीचं पीक वाया; शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय

Maharashtra Live News Update: गेवराईत 3 एकर बागायती जमीन गेली वाहून

Kalyan: कामावर गेला पण परत आलाच नाही, हाय टेन्शन वायरला स्पर्श; विजेचा झटका लागून तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT