Uttar Pradesh Crime Saam Tv
देश विदेश

Crime: ४ वर्षांच्या भाचीची बलात्कार करून हत्या, पोलिसांकडून आरोपीचं एन्काऊंटर

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशमध्य ४ वर्षांच्या मुलीवर मामाने बलात्कार केला त्यानंतर तिची हत्या केली होती. या प्रकरणातील आरोपी पोलिस एन्काऊंटरमध्ये मारला गेला. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली.

Priya More

Summary -

  • उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांकडून आरोपीचा एन्काऊंटर

  • ४ वर्षांच्या भाचीवर बलात्कार करून केली होती हत्या

  • आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला होता

  • या गोळीबारात दोन पोलिस जखमी झालेत

४ वर्षांच्या भाचीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीचं पोलिसांनी एन्काऊंटर केलं. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये ही घटना घटना घडली. पोलिसांनी रविवारी आरोपीचं एन्काऊंटर केले. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची टीम गेली होती. आरोपीने त्यावेळी पोलिसांवर गोळ्या झाडल्या. यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात आरोपी ठार झाला. आरोपीने गेलेल्या गोळीबारात दोन पोलिस जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी एन्काऊंटर केलेल्या आरोपीचे नाव जसीम उर्फ छोटू होते. भाचीवर बलात्कार करून तिची हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला होता. पोलिस या आरोपीचा शोध घेत होते. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी ५०,००० रुपयांचे बक्षीस देखील जाहीर केले होते. पोलिसांनी शेवटी आरोपीचा शोध घेतला पण त्याला अटक करत असताना त्याने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केला.

हत्या करण्यात आलेल्या ४ वर्षांच्या मुलीचे कुटुंबीय मुळचे हापूडच्या पिलखुआ गावातील रहिवासी होते. तिचे वडील कामानिमित्त गाझियाबाद येथे राहत होते. आरोपी जसीम (२५ वर्षे) हा मुजफ्फरनगरच्या सिसौली भागात राहणारा होता. तो आपल्या बहिणीच्या घरापासून १०० मीटर दूर अंतरावर भाड्याने घर घेऊन राहत होता. तो मजुरी करायचा. ११ एप्रिल रोजी तो दुपारी १ वाजता बहिणीच्या घरी आला होता. त्यावेळी त्याने ४ वर्षांच्या भाचीला फिरायला घेऊन जातो सांगून सोबत घेऊन गेला.

संध्याकाळ झाली तरी जसीम आपल्या मुलीला घेऊन घरी परत आला नाही त्यामुळे चिंतेत आलेल्या त्याच्या बहिणीने तो राहतो त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली. तेव्हा आरोपीने खोटं सांगितले की, मी तिला कधीच घरी आणून सोडले होते. आरोपीच्या उत्तरामुळे मुलीच्या आई-वडील चिंतेत आले त्यांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तात्काळ मुलीचा शोध सुरू केला. तेव्हा पोलिसांना बिकानेर ८० फूट रोडवर एका कारखाली मुलीचा मृतदेह सापडला. आरोपीने मुलीवर बलात्कार करून तिची गळा आवळून हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने तिचा मृतदेह एका कारखाली टाकून दिला. पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्याचे कळताच आरोपी फरार झाला होता. अखेर पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राममंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात? पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली?

तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध? महाराष्ट्रात भेसळमाफियांचा उच्छाद, भेसळमाफियांना होणार थेट मृत्यूदंडाची शिक्षा?

SCROLL FOR NEXT