उत्तर प्रदेशच्या आग्रामधून नात्याला काळिमा फासणाऱ्या हत्याकांडातून धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. बिसरा रिपोर्टमुळे आग्रा हत्याकांडात ट्विस्ट निर्माण झालाय. वाढदिवसाच्या दिवशी सासरच्या मंडळींनी शांत डोक्याने कट रचून जावयाची हत्या केली. हे हत्याकांड तब्बल ४ महिन्यांनंतर उघडकीस आलं आहे.
काय आहे प्रकरण?
आग्रामधील ट्रान्स यमुना पोलीस स्टेशनच्या हद्दीत संपूर्ण घटना घडली होती. जितेंद्र यांना २२ नोव्हेंबर २०२५ रोजी सासरी वाढदिवशाच्या बोलावून घेतलं. वाढदिवसाच्या आनंदमयी वातावरणात जावयाच्या हत्येचा प्लान रचण्यात आला होता. वाढदिवसाच्या दिवशी जावई जितेंद्र यांना भरपूर दारू पाजली. दारू प्यायल्यानंतर जितेंद्र यांची तब्येत बिघडली. त्यांची तब्येत गंभीर झाल्यानंतर रात्री ३ वाजता रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी जितेंद्र यांना मृत घोषित केले.
जितेंद्र यांच्या सुरुवातीच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नव्हते. त्यामुळे या प्रकरणाचा तपास पोलिसांनी विशेष पथकाकडे सोपवला. जवळपास ४ महिन्यानंतर एफएसएल रिपोर्ट आल्याने हत्याकांडाचे सत्य उघडकीस आलं. जितेंद्र यांची हत्या विष देऊन करण्यात आल्याचे रिपोर्टमधून समोर आलं. जितेंद्र यांच्या संशयास्पद मृत्यूचे कारण समोर येताच सर्वच चकीत झाले.
जितेंद्र यांच्या नातेवाईकांनी कोर्टाच्या आदेशानंतर ५ जानेवारी २०२६ रोजी ट्रान्स यमुना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर १६ मार्च रोजी या प्रकरणाचा तपास कमलानगर पोलिसांना सोपवला.
चौकशीतून काय समोर आलं?
गेल्या अनेक दिवसांपासून जितेंद्र आणि त्याची पत्नी तनूचे वाद होते, असा चौकशी आणि तपासातून समोर आलं आहे. या वादानंतर त्यांची पत्नी आणि वडील महेंद्र यांनी मिळून जितेंद्र यांच्या हत्येचा कट रचला.
त्या दिवशी नेमकं काय घडलं?
सासऱ्याने दारूमध्ये विषारी पदार्थाचे मिश्रण केलं. त्यानंतर जावयाला विषारी दारू पाजली. या दारूचे सेवन केल्याने जावयाचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पत्नी आणि सासऱ्याला अटक केली आहे. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.