Uttar Pradesh Crime  Saam Tv
देश विदेश

पुतण्यासोबत संबंध, नंतर जत्रेला नेत नवऱ्याचा काटा काढला, ८ वर्षांच्या मुलाकडून आईचा खरा चेहरा समोर

Woman Kills Husband with Lovers Help: बाराबंकी येथे पत्नीनं पतीला संपवलं. पुतण्याच्या प्रेमात पत्नीनं हे कृत्य केलं. रिक्षा चालकाला १लाखांची सुपारी देऊन पतीला संपवलं.

Bhagyashree Kamble

  • बॉयफ्रेंडसाठी पत्नीनं पतीचा काटा काढला.

  • नवऱ्याचा काटा काढण्यासाठी १ लाख रूपयांची सुपारी दिली.

  • ८ वर्षांच्या मुलामुळे भंडाफोड.

उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रियकरासाठी बायकोनं नवऱ्याचा काटा काढला. पुतण्यासोबत असलेल्या अवैध संबंधातून बायकोनं नवऱ्याला संपवण्याचा निर्णय घेतला. नवऱ्याचा मृतदेह सापडताच बायकोनं पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ८ वर्षांच्या मुलामुळे हे प्रकरण उघडकीस आलं. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा असं आरोपी पत्नीचं नाव आहे. तर, हनुमंत लाल असे मृत नवऱ्याचं नाव आहे. पूजाचं पुतण्यासोबत अवैध संबंध होते. या कारणामुळे हनुमंत आणि पूजामध्ये रोज भांडणं होत. याच भांडणाला कंटाळून पूजानं नवऱ्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. तिनं लखनौमध्ये राहणाऱ्या ई रिक्षा चालक कमलेशला पतीचा काटा काढण्यासाठी सुपारी दिली.

तिनं कमलेशला १ लाख रूपये दिले. १३ ऑक्टोबरच्या सायंकाळी पूजा तिच्या मुलासह आणि पतीसह मोटारसायकलवरून जत्रेला गेली होती. जत्रेवरून परतत असताना पुजानं मोटारसायकलवर थंडी वाजत असल्याचं कारण दिलं. त्यानंतर पूजानं कमलेश चालवत असलेली ई - रिक्षा बुक केली.

पूजा मोटारसायकलवरून उतरली. तसेच ई- रिक्षामध्ये जाऊन बसली. ताहीरपुर वळणावर रिक्षा आणि मोटारसायकल पोहोचल्यानंतर कमलेश आणि पत्नीनं मिळून पतीचा खून केला. हनुमंतच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून हत्या केली. यानंतर कमलेश आणि पूजा फरार झाले. हनुमंतचा जागीच मृत्यू झाला. हनुमंतची बॉडी लखनऊ रोडवर मिळाली.

बायकोनं पोलिसांसमोर नवऱ्याचा मृत्यू अपघाती झाला असावा, असा संशय व्यक्त केला. मात्र, त्यानंतर तपास आणि चिमुकलाच्या माहितीवरून पूजाचं खरं रूप पोलिसांसमोर आलं. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळाच्या पाहणी दौऱ्याला दांडी; जिल्हाधिकाऱ्यांनी केज तहसीलदारांचा पदभार तडकाफडकी काढला

Maharashtra News Live Update: मुंबई आणि उपनगरात ढगांच्या गडगडासह जोरदार पाऊस

१ मेसेजचे १४ पैसे घेणार WhatsApp! १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम, तुमच्यावर काय परिणाम?

Skipping Dinner For Diabetes: रात्रीचे जेवण टाळल्याने डायबिटीज कंट्रोलमध्ये राहतो का? रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

SCROLL FOR NEXT