Uttar Pradesh Truck-Tractor Accident  Saam TV
देश विदेश

Accident News: भरधाव ट्रकची ट्रॅक्टरला पाठीमागून धडक; भीषण अपघातात ४ महिलांचा जागीच मृत्यू, २४ जखमी

Uttar Pradesh Accident: भरधाव वेगात असलेल्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरसह ट्रॉलीला जोरदार धडक दिली. या घटनेत ४ महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर २४ जण गंभीर जखमी झाले.

Satish Daud

Uttar Pradesh Truck-Tractor Accident

भरधाव वेगात असलेल्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरसह ट्रॉलीला जोरदार धडक दिली. या घटनेत ४ महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर २४ जण गंभीर जखमी झाले. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना उत्तर प्रदेशच्या भोगाव जिल्ह्यातील मैनपुरी परिसरात शनिवारी (ता. २०) पहाटेच्या सुमारास घडली.

अपघातानंतर मृतांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी मोठा आक्रोश केला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती कन्नौजच्या छिब्रामौ पोलीस स्टेशन हद्दीतील कुंवरपूर गावातील रहिवासी असून ते शुक्रवारी नामकरण सोहळ्यासाठी बेलधारा गावात गेले होते.

शनिवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास सर्वजण ट्रॅक्टर-ट्रॉलीने घरी परतत होते. भोगाव परिसरातील द्वारकापूर येथे ट्रॅक्टर आले असता, समोरील लाईट अचानक बंद पडली. त्यावेळी चालकाने ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला उभा करून लाईट दुरुस्त करण्यास सुरुवात केली.

त्याचवेळी पाठीमागून अचानक एक भरधाव ट्रक आला. या ट्रकने ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रॉलीत बसलेल्या ४ महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर २४ जण जखमी झाले. सर्व मृत व जखमी हे कुंवरपूर छिब्रामाळ गावचे रहिवासी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Job: कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; RITES मध्ये भरती सुरु; पगार ४६०००, जाणून घ्या सविस्तर

65 वर्षे जुना कायदा बदलण्याच्या तयारीत मोदी सरकार, खासदार अपात्रता कायद्याच्या जागी नवीन कायदा आणण्याची केंद्राची योजना

Maharashtra News Live Updates: पुणे शहरासह जिल्ह्यात आज अनेक नेत्यांच्या सभा

Shani Margi 2024: शनी देव कुंभ राशीत मार्गस्थ; 'या' राशींसमोर संकटं येणार, आर्थिक घडी विस्कटणार

Ayushman Bharat Yojana: ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेता येणार उपचार; पाहा लिस्ट

SCROLL FOR NEXT