Uttar Pradesh Kanpur Accident News Saam Tv
देश विदेश

Accident News : प्रसिद्ध उद्योजकाच्या मुलानं दारूच्या नशेत कार दामटवली, अनेकांना उडवलं; ६ गंभीर जखमी

Uttar Pradesh Kanpur Accident News : कानपुरमध्ये दारूच्या नशेत भरधाव लॅम्बोर्गिनी चालवत व्यावसायिकाच्या मुलाने भीषण अपघात घडवला. या घटनेत ६ जण गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Alisha Khedekar

  • दारूच्या नशेत भरधाव लॅम्बोर्गिनीने भीषण अपघात

  • बुलेट व ऑटोला धडक देत फुटपाथवर कार आदळली

  • ६ जण गंभीर जखमी, परिसरात खळबळ

  • उद्योगपतीच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल

उत्तर प्रदेश मधील कानपुर जिल्ह्यात एका बड्या व्यावसायिकाच्या मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगात, आलिशान कार चालवत अनेकांना उडवल्याची बातमी समोर आली आहे. या अपघातात ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी तरुणाविरोधात आयपीसीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या तरुणाचे नाव शिवम मिश्रा असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाचे नाव शिवम मिश्रा असे आहे. त्याचे वडील तंबाखूचे प्रसिद्ध व्यापारी आहेत. कानपूरच्या पॉश ग्वाल्टोली भागात, एका वेगाने येणाऱ्या लॅम्बोर्गिनी कारने एका बुलेटला आणि नंतर एका ऑटोरिक्षाला धडक दिली आणि नंतर ती अनियंत्रित होऊन फूटपाथवर जाऊन आदळली. या अपघातात ६ जण गंभीर जखमी झाले आहेत.

सदर घटना रविवारी दुपारी ३:१५ च्या सुमारास घडली आहे. या तरुणाची कार पोलिसांनी जप्त केली आहे. या घटनेनंतर, कार चालवणाऱ्या शिवम मिश्राला त्याच्या अंगरक्षकांनी तुटलेल्या खिडकीतून बाहेर काढले आणि तेथून नेले.

अपघाताच्या वेळी तो दारूच्या नशेत होता असा दावा घटनास्थळी असलेल्या लोकांनी केला. दोन वर्षांपूर्वी शिवम मिश्राच्या वडिलांच्या बंशीधर टोबॅको लिमिटेड कंपनीवर आयकर विभागाने छापा टाकला तेव्हा चर्चेत आला होता. कानपूर, दिल्ली, मुंबई आणि गुजरात या पाच राज्यांमधील २० ठिकाणी छापे टाकण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

राज्यात घराणेशाहीची दुसरी इनिंग, मुलांच्या आमदारकीसाठी नेत्यांचं लॉबिंग, नेत्यांच्या मुलांसाठी निष्ठावंतांना डावलणार?

पुण्यात विषारी दारुचे 14 बळी, पुणे पोलीस करतायत तरी काय, संतप्त नागरिकांनी दारूचा अड्डा केला उद्ध्वस्त!

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! राज्यभर आयुर्वेदीक केंद्रांवर FDA ची कारवाई; नामांकित कंपनीचा औषधसाठा जप्त

SCROLL FOR NEXT