UP Accident Saamtv
देश विदेश

UP News: दिल्ली अपघाताची पुनरावृत्ती! सायकलस्वार विद्यार्थ्याला 1KM फरफटत नेले; काळजाचा थरकाप उडवणारा Video समोर

रस्त्यावरील लोक, वाहनचालक, अनेकांनी आरडा ओरडा केला, गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. गाडीचा पाठलागही केला मात्र , कार चालकाने गाडी थांबवली नाही.

Gangappa Pujari

Uttar Pradesh: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीमधील भीषण अपघाताने संपूर्ण देशभरात खळबळ माजली होती. या भीषण अपघातात युवतीला १३ किमी फरफटत नेले होते, या अपघातात निष्पाप तरुणीला जीव गमवावा लागला होता. ही अंगावर काटा आणणारी बातमी ताजी असतानाच अशाच प्रकारच्या भीषण अपघाताची पुनरावृत्ती उत्तरप्रदेशमध्ये (Uttar Pradesh) घडली आहे. या भीषण अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवार( ६ जानेवारी) रोजी सायंकाळी घडली आहे. यामध्ये केतन नावाचा मुलगा आपल्या मित्रांसोबत क्लाससाठी जात होता. यावेळी शहरातील जवान चौकात एका कारने केतनच्या सायकलला धडक दिली. या धडकेने केतनची सायकल दुर उडून पडली आणि तो स्वतः गाडीच्या मागच्या गार्डमध्ये अडकला.

मात्र कारचालकाने अपघातानंतर कसलीही परवा न करता गाडी तशीच पळवायला सुरूवात केली. रस्त्यावरील लोक, वाहनचालक, अनेकांनी आरडा ओरडा केला, गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. गाडीचा पाठलागही केला मात्र , कार चालकाने गाडी थांबवली नाही. (Car Accident)

दुसऱ्या चौकात लोकांनी गाडी थांबवून कार चालकाला बाहेर काढत जोरदार मारहाण केली. तसेच त्याची कारही पलटी करण्यात आली. या अपघातात मुलगा केतनच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.त्याचे डोके गाडीच्या वरच्या भागात अडकल्याने कंबरेच्या वरचा भाग सुरक्षित आहे.

मात्र त्याचा पाय तब्बल एक किलोमीटर पर्यंत रस्त्यावर फरफटत नेल्याने गंभीर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, चालकाला अटक केली आहे. या घटनेचा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rasam Rice Recipe: घरच्या घरी टेस्टी साऊथ इंडियन स्टाईल रसम राईस नक्की बनवा, वाचा सोपी रेसिपी

Raigad Fort : शिवरायांच्या स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार, 'रायगड'बद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहितेय का?

Maharashtra News Live Update: मेळघाटातील भुमकाबाबा मंदिर अखेर दर्शनासाठी खुले

Gaurav More Wedding : 'फिल्टरपाड्याचा बच्चन' चढला बोहल्यावर; गौरव मोरेने गुपचूप बांधली लग्नगाठ, बायकोसोबतचा पहिला फोटो आला समोर

Ashok Kharat Case: भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट; आणखी एक महिला अधिकारी रडारवर, प्रशासनात खळबळ

SCROLL FOR NEXT