Luxury Car Crushed by Bus Two Brothers Among 4 Dead Saam
देश विदेश

आईची अस्थी घेऊन जाताना कारचा अपघात; भरधाव बसची मागून धडक, २ सख्ख्या भावांसह चौघांचा मृत्यू

Luxury Car Crushed by Bus Two Brothers Among 4 Dead: आईच्या अस्थी विसर्जनासाठी घेऊन जात असताना कुटुंबावर काळाचा घाला. बुंदेलखंड एक्स्प्रेस वेवर बस आणि चारचाकीची धडक. चौघांचा मृत्यू.

Bhagyashree Kamble

उत्तर प्रदेशात भयानक अपघाताची घटना उघडकीस आली आहे. आलिशान चारचाकी आणि बसची भीषण धडक झाली. मिळालेल्या माहितीनुसार, चारचाकीतून आईच्या अस्थी विसर्जनासाठी घेऊन जात असताना चारचाकीचा अपघात घडला. या अपघातात दोन भावांसह एकूण चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, काही जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. दाट धुक्यामुळे हा अपघात घडला असल्याची माहिती आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात बुंदेलखंड एक्स्प्रेस वेवर घडला आहे. मृतक हे महोबा जिल्ह्यातील खन्ना पोलीस ठाणे परिसरातील ग्योडी गावातील रहिवासी असल्याची माहिती आहे. घनश्याम (वय वर्ष ५५) यांच्या आईचे नुकतेच निधन झाले होते. अंत्यसंस्कारानंतर घनश्याम आपला लहान भाऊ रामसहोदर (वय वर्ष ४०) आणि सिद्धगोपाल (वय वर्ष ६५) यांच्यासह कुटुंबातील इतर चार सदस्यांसह रविवारी ते अस्थी विसर्जनाला गेले होते.

त्यांचे कुटुंब रविवारी सकाळी खन्ना येथून प्रयागराजच्या दिशेने अस्थी विसर्जनासाठी निघाले होते. चारचाकी आधी मौदहा कोतवाली परिसरातील इचौलीजवळील बुंदेलखंड एक्स्प्रेस वेवरील पेट्रोल पंपावर गेली. डिझेल भरल्यानंतर कार थेट एक्स्प्रेस वेवर गेली. एक्स्प्रेस वेवर पोहोचताच मागून येणाऱ्या भरधाव पर्यटक बसने चारचाकीला धडक दिली. टक्कर इतकी जोरदार होती की, चारचाकीचा चुराडा झाला.

मौदहाचे पोलीस संतोष कुमार सिंह यांनी सांगितले की, 'दोन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला. तर, इतर दोघांचा रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर, इतर दोघांवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत'. या घटनेनंतर कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला असून, हा अपघात नेमका घडला कसा? याचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT