Uttar Pradesh Accident News Saam tv
देश विदेश

Accident News: भयंकर! ट्रकची स्कूटीला धडक, 500 मीटरपर्यंत फरफटत नेले; चिमुकल्यासह तिघांचा मृत्यू

अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळीच वाहन सोडून पळून गेला असून पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे..

Gangappa Pujari

Uttar Pradesh Accident: उत्तर प्रदेशमध्ये (Uttar pradesh) स्कूटी आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत स्कूटीवरील तीन जण ठार झाले आहेत. उत्तर प्रदेशमधील शाहजहाँपूर येथे एक भयानक अपघात घडला आहे. येथे एका ट्रकने स्कूटीला धडक दिली. त्यानंतर त्या अपघातग्रस्त स्कूटीला ५०० मीटरपर्यंत फरफटत नेले.

या भीषण अपघातामध्ये एका ३ वर्षांच्या मुलासह तीन जणांचा मृत्यू झाला आहे.अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाल्याचे समोर आले आहे.

पोलिस अधीक्षक आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात शुक्रवारी रात्री कटरा ओव्हरब्रिजजवळ झाला. कटरा पोलीस ठाणे क्षेत्रातील लालपूर गावातील रहिवासी रामदीन, त्यांची वहिनी सूरजा देवी आणि त्यांचा तीन वर्षांचा पुतण्या घरी जात होते. तेवढ्यात मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना टक्कर दिली. त्यामुळे हा भीषण अपघात झाला.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी स्कुटीवरील तिघांनाही उपचारासाठी बरेलीला पाठवले, मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत, अशी माहितीही पोलिस अधिक्षकांनी दिली आहे.

दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळीच वाहन सोडून पळून गेला असून पोलिसांनी ट्रक ताब्यात घेत चालकाचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

What not to ask ChatGPT: चुकूनही ChatGPT ला विचारू नका या गोष्टी; फायदा सोडून नुकसान होईल

GK: भारतात सूर्य सर्वात आधी मावळतो कोणत्या गावात मावळतो?

Maharashtra Live News Update: सुर्यवंशी मृत्यू प्रकरण; सोमनाथच्या मृत्यूशी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Prajakta Mali: प्राजक्ता जणू सौंदर्याची खाण...

Parbhani : आदर्श शेतवाटणी! दोन प्राध्यापक भावांनी शेतकरी भावाला दिला अधिक हिस्सा; मुलांचे शिक्षण व लग्नाचीही घेतली जबाबदारी

SCROLL FOR NEXT