US Visa Saam Tv
देश विदेश

US Visa: अमेरिकेचा मोठा निर्णय! व्हिसा शुल्कात १४८ टक्क्यांनी वाढ; पर्यटक आणि विद्यार्थ्यांच्या खिशाला फटका

US Visa Fees Increase: अमेरिकेने व्हिसाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने व्हिसी फीमध्ये वाढ केली आहे. यामध्ये पर्यटक आणि विद्यार्थ्यांच्या खर्चात अजूनच वाढ होणार आहे.

Siddhi Hande

अनेकांचे परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न असते. अनेक भारतीय मुले अमेरिकेत जाऊन उच्च शिक्षण घेतात. अमेरिकेत जाण्यासाठी तुमच्याकडे व्हिसा असावा लागतो. दरम्यान, आता व्हिसा काढण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांना अजून पैसे मोजावे लागणार आहे. अमेरिकेने व्हिसाच्या नियमात बदल केले आहेत.

अमेरिका व्हिसाच्या या नियमांमुळे भारतीय पर्यटकांना, विद्यार्थ्यांना आणि H-1B वर्कर्संची व्हिसा फी वाढवली आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांच्या खर्चात चांगलीत वाढ होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी बन बिग ब्युटिफुल अॅक्ट पास केला आहे. यामध्ये व्हिसा कॅटेगरीसाठी २५० डॉलर (२१ हजार रुपये) व्हिसा इंटिग्रीटी फी द्यावी लागणार आहे. काही वेळा तुम्हाला १४८ टक्क्यांपेक्षा जास्त फी द्यावी लागणार आहे.

डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी (DHS)ने व्हिसा शुल्कात वाढ केल्याची घोषणा केली आहे. ही नवीन व्हिसा इंटिग्रीटी फी २०२६ पासून लागू केली जाईल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही सर्व अटी पूर्ण केल्या तर हे शुल्क परत केले जाईल.

फ्रॅगोमेनच्या रिपोर्टनुसार, व्हिसा जारी करताना २५० डॉलर शुल्क आकारले जाईल. यानंतर नियमांनुसार, भविष्यात हे शुल्क मूळ रक्कमेपेक्षा वाढवण्याचा अधिकार DHS ला आहे.

नवीन शुल्काचा परिणाम

२०१६ च्या ग्राहक किंमत निर्देशांक (CPI)च्या आधारे व्हिसा इंटिग्रिटी फी ठरवली जाते. जशी महागाई वाढते तशी ही फीदेकील वाढते. हे शुल्क कोणत्याही परिस्थितीत माफ करता येत नाही. याचा परिणाम विद्यार्थी, पर्यटक आणि कामगारांवर होणार आहे. त्यांना आता जास्त शुल्क भरावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: काळ्या बुरशीचा कांदा खाल, जीवानं जाल? बुरशीयुक्त कांद्यामुळे किडनी, लिव्हरला धोका?

देवेंद्र फडणवीसांना केंद्रात नवी जबाबदारी? दिल्लीत भाजपच्या गोटात हालचाली

क्रिती सेनन कपड्यांवरून ट्रोल; राहुल गांधींची सडेतोड प्रतिक्रिया

Raksha Bandhan: रक्षाबंधनाला भावाला चुकूनही 'या' रंगांच्या राखी बांधू नका, नाही तर...

Maharashtra News Live Update: अहेरीतील आरोग्य, आदिवासी विकासकामांना गती द्या; जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना

SCROLL FOR NEXT