रशियाच्या ड्रोन मदतीमुळे इराणची ताकद वाढली; जागतिक राजकारणात नवा टर्न saam tv
देश विदेश

Iran-US War: रशियाच्या ड्रोनमुळे इराणची ताकद वाढली; अमेरिकेच्या वर्चस्वादी धोरणाला रशियाचा शह?

US-Iran War: रशियानं अमेरिकेविरोधात इराणला लष्करी मदत पुरवण्याचा मोठा निर्णय घेतलाय. त्यामुळे अमेरिकी वर्चस्ववादी धोरणाला रशिया कसा शह देणार? इराण- अमेरिकामधील संघर्षात रशियानं उडी घेतल्यानं युक्रेन कशी आक्रमक झालीय.पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Suprim Maskar

रशिया- युक्रेन युद्धाच्या धगधगत्या रणभूमीवर आता एक मोठा आणि अनपेक्षित 'उलटफेर' पाहायला मिळतोय. रशियानं अमेरिकेचा बदला घेण्यासाठी आता एक नवी चाल खेळलीय. ज्याप्रमाणे अमेरिका युक्रेनला शस्त्रास्त्रांची मदत करत आहे..अगदी त्याच पावलांवर पाऊल ठेवत आता रशिया इराणला इतिहासात पहिल्यांदा लष्करी ताकद पुरवतोय. रशिया- इराणमध्ये काय सीक्रेट डील झालीय, पाहूयात.

रशिया इराणला केवळ अन्नधान्य किंवा औषधेच नाही, तर अत्यंत घातक 'कामिकेज़ ड्रोन' (Kamikaze Drones) पुरवठा करणार आहे. यामध्ये 'गेरान-२' आणि 'शाहेद-१३६' सारख्या प्रगत मॉडेल्सचा समावेश आहे. हे तेच ड्रोन आहेत ज्यांनी युक्रेन युद्धात मोठा विध्वसं घडवून आणला होता...या ड्रोनमुळे इराणला इस्रालयची संरक्षण यंत्रणा भेदणं सोपं होणार आहे... त्यात रशिया आणि इराण हे कॅस्पियन समुद्राद्वारे एकमेकांशी जोडलेले असल्यानं शस्त्रास्त्रांची ही तस्करी रोखणे पाश्चात्य देशांसाठी कठीण आहे.

दुसरीकडे रशियाची ही चाल लक्षात येताच युक्रेननेही जोरदार प्रत्युत्तर दिलयं. युक्रेनने रशियाच्या तेल साठ्यांवर विध्वंसक हल्ला केलाय.

रशियामधील 3 मोठे तेल पोर्टचं नुकसान

उस्त-लुगा बंदरावर युक्रेनचा मोठा ड्रोन हल्ला

उस्त- लुंगा बंदरावरून दररोज 7 लाख बॅरल तेलाची निर्यात होते

त्यामुळे रशियाची तेल निर्यात 40 टक्के घटली

दरम्यान रशियावरील या हल्ल्यानंतर अमेरिकेला शह देण्याचे मनसुबे उधळून लावण्याचा प्रयत्न युक्रेननं केलाय. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्सकी यांनी तर पुतिन हे अमेरिकेला ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप केलाय.. तर दुसरीकडे अमेरिकेने युक्रेनला गुप्त माहिती देणं बंद केलं तर रशियाही इराणला मदत करणं थांबवेल, असा प्रस्ताव रशियानं दिलाय. त्यामुळे इराण आणि रशियामधील ही वाढती लष्करी देवाणघेवाण केवळ युक्रेन युद्धापुरती मर्यादित नसून, ते अमेरिकेच्या जागतिक वर्चस्वाला शह देण्याचे एक मोठे धोरणात्मक पाऊल मानले जातयं. त्यामुळे इराण- अमेरिका, इस्रायल युद्ध आणखी पेटणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये! टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी पोलिस आयुक्तांना फोन

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

औषधाच्या पाकिटावर असलेल्या लाल रंगाच्या पट्टीचा अर्थ माहिती आहे का ? जाणून घ्या त्याचे महत्त्व

SCROLL FOR NEXT