AI-powered battlefield intelligence systems analyzing drone and satellite data for strategic military targeting. Saam tv
देश विदेश

युद्धभूमीवर शत्रूविरोधात AIचा वापर, तेहरानवरील हल्ल्यांमागे AI चा सल्ला

Us Ai War Strategy Iran Tehran Palantir: इराणविरुद्ध युद्धात अमेरिकेनं AI युद्धनितीचा वापर केला... AI चा सल्ला घेऊन तेहरानवरील हल्ल्यासाठी अमेरिकन सैन्यानं कशी रणनीती आखली होती... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

युद्ध आता केवळ गोळ्यांनी, तोफांनी आणि क्षेपणात्र हल्ल्यांनीच लढलं जात नाही, तर ते 'कोडिंग' आणि 'अल्गोरिदम'नं लढलं जातंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीचं एका सॉफ्टवेअर कंपनीची प्रशंसा केली आणि जगभरात चर्चेला उधाण आलंय. ती कंपनी म्हणजे 'पॅलँटिर'..... इराण युद्धात अमेरिकेनं ज्या पद्धतीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच AI चा वापर केला, त्यानं युद्धतंत्राची व्याख्याच बदलून गेलीय...इराणची राजधानी तेहरानवरील हल्ल्यासाठी अमेरिकेनं युद्धात वापरलेली 'मेव्हेन स्मार्ट सिस्टम काय आहे? पाहुयात...

28 फेब्रुवारीला तेहरानवर हल्ल्यासाठी अमेरिकेनं पेंटागॉनच्या देखरेखीखाली एका सॉफ्टवेअर प्रोग्राम तयार केला. त्यातून हजारो सॅटेलाइट प्रतिमा आणि ड्रोन व्हिडिओ फिल्टर करून अमेरिकन कमांडर्ससाठी 1 हजार हून अधिक हल्ल्यांचे पर्याय तयार केले... रणांगणावरील वाहने, शस्त्रे आणि गुप्त तळ ओळखणे, त्यांचा मागोवा घेणे आणि त्यांचे वर्गीकरण करणे ही मेव्हेन स्मार्ट सिस्टमची मुख्य कामे आहेत. शत्रूचे लक्ष्य शोधण्यासाठी या AI तंत्रज्ञानामुळे एका मिनिटापेक्षा कमी वेळेवर लागतो...

त्यामुळे अमेरिकी सैन्य बहुतांश युद्धात या AI तंत्रज्ञानाचा वापर करतयं...हे तंत्रज्ञान हल्ला कुठे करायचा आणि हल्ल्यासाठी किती पुरवठा आवश्यक आहे? हे कमांडर्सना आगाऊ सांगितले जाते...गेल्या वर्षीच या AI कंपनीला अमेरिकन सैन्याकडून 10 अब्ज डॉलर्सचं मोठं कंत्राट देण्यात आलयं..

विशेष म्हणजे पॅलँटिर कंपनीच्या या सॉफ्टवेअरची माहिती काही वर्षांपूर्वी वॉशिंग्टनबाहेर कोणाला नव्हती तेच AI सॉफ्टवेअर आज अमेरिकन सैन्याचा कणा बनलाय. युद्धात तंत्रज्ञान हवं की नको, हा वाद आता मागे पडलाय. आता प्रश्न हा आहे की, विनाशाची बटणं जेव्हा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या हातात जातात, तेव्हा माणुसकीचं काय? पॅलँटिरच्या मेव्हेन सिस्टीमने जगाला भविष्यातील युद्धाची झलक इराण- अमेरिका संघर्षात दाखवलीय. हे तंत्रज्ञान जगाला विनाशाच्या उंबरठ्यावर घेऊन जाईल, अशी भिती व्यक्त होतेय. त्यामुळे युद्ध नको शांतता हवी असाच सूर जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी उमटतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anu Meena Death Case: मुलांसमोर मारझोड, बायकोच्या तोंडावर थुंकायचा; CCTV व्हिडिओतून समोर आला अभियंता नवऱ्याचा राक्षसी चेहरा

Pune Crime News : पुणे तिथं काय उणे! आंब्याचे पैसे कोण देणार? या क्षुल्लक कारणावरून नवरा-बायकोमध्ये जोरदार हाणामारी

कृषिप्रधान देशाची शोकांतिका! कांद्याला कवडीमोल भाव; नाशिकमधील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Pravin Tarde : 'देऊळ बंद 2' चित्रपट बनवण्यामागचं मुख्य कारण आलं समोर, अंबाबाईचे दर्शन घेतल्यावर प्रवीण तरडेंनी सर्वकाही सांगितले

Gold Price Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात मोठा बदल; जाणून घ्या वाचा २२ अन् २४ कॅरेट सोन्याचे दर

SCROLL FOR NEXT