America Saam Tv
देश विदेश

America: अमेरिकेकडून पाकिस्तानला मोठा झटका, ४ क्षेपणास्त्र कंपनीवर लावले निर्बंध

America Action On Pakistan: अमेरिकेने पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तान तयार करत असलेल्या क्षेपणास्त्रांमुळे अमेरिकाला हानी पोहचू शकते, असं अमेरिकेने म्हटलं आहे.

Siddhi Hande

अमेरिकेने पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे. अमेरिकेने पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमावर बंदी घातली आहे. त्यांनी तीन क्षेपणास्त्र निर्मिती करणाऱ्या कंपन्याना मोठा दंड ठोठावला आहे. अमेरितेच्या या कारवाईनंतर पाकिस्ताननेदेखील मोठे पाऊल उचलले आहे.

अमेरिका पाकिस्तानसोबत भेदभाव करत आहे त्यामुळे आम्ही या अन्यायाला वाचा फोडणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पाकिस्तान अमेरिकेसह दक्षिण आशियाबाहेर हल्ला करण्यासाठी क्षेपणास्त्रे बनत होता. अमेरिकेला धोक्याची जाणीव होती, त्यामुळे व्हाईट हाउसने मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने चार कंपन्यांवर बंदी घातली आहे. यात एरोस्पेस, डिफेन्स एजन्सी, नॅशनल डेव्हलपमेंट कॉम्पलेक्स यांचा समावेश आहे.याशिवाय एफिलिएट्स इंटरनॅशनल आणि रॉकसाइड एंटरप्रायझेस आणि खतर अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडवरही निर्वंध लादण्यात आले आहेत.

अमेरिकेचा हा निर्णय शांततेला धोका असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. कोणत्याही पुराव्याशिवाय अमेरिका शस्त्र व्यापाराला लक्ष करत आहे. इतर देशांना लष्करी तंत्रज्ञानाचा परवाना दिला जात आहे. दुटप्पी वृत्ती पाकिस्तान बाळगत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

अमेरिकेने चिनी कंपन्यांवरही निर्बंध लादले होते. अमेरिकेने सांगितले की, पाकिस्तान क्षेपणास्त्र बनवून कोणाला टार्गेट करत आहे हा एक प्रश्न आहे. पाकिस्तानच्या या निर्णयामुळे अमेरिकेलाही धोका निर्माण होऊ शकतो.पाकिस्तान आशियाबाहेर अमेरिकेवरही हल्ला करु शकतो, असं व्हाईट हाउसमधील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यातील रुग्णालयात बॉम्ब ठेवणारा आरोपी कोण? नागपूर कनेक्शन उघड, धक्कादायक माहिती समोर

Maharashtra News Live Update: डॉ.आनंद नाडकर्णींच्या पार्थिवाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं अंत्यदर्शन

IPL 2026: मुंबईने पंजाबचा खेळ बिघडवला! आता प्लेऑफचं समीकरण काय? कुणाला किती संधी? वाचा नेमकं गणित

Face Care: पिंप्लस, डाग आणि टॅनिंग कमी करायची आहे? मग हा घरी तयार केलेला कुलिंग फेसपॅक करा ट्राय

राज्यातील प्रशासनात उलटफेर; 4 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

SCROLL FOR NEXT