Crude Oil Price Saam Digital
देश विदेश

Crude Oil Price : रशियातून भारतात येणाऱ्या तेलाच्या जहाजांवर अमेरिकेने घातली बंदी, नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घ्या

Russian Crude Oil Price : तेलाने भरलेली रशियन जहाजं येत्या काही आठवड्यांत भारतात पोहोचणार आहेत. मात्र अमेरिकेने या जहाजांबर भारतात येण्यासाठी बंदी घातल आहे, तरीही ही तेलाने भरलेली जहाजं भारताच्या दिशेने येत आहेत.

Sandeep Gawade

Crude Oil Price

फेब्रुवारी 2022 पासून रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. तेव्हापासून भारत रशियाकडून सवलतीच्या दरात मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत आहे. तेलाने भरलेली रशियन जहाजं येत्या काही आठवड्यांत भारतात पोहोचणार आहेत. मात्र अमेरिकेने या जहाजांबर भारतात येण्यासाठी बंदी घातल आहे, तरीही ही तेलाने भरलेली जहाजं भारताच्या दिशेने येत आहेत.

'इंडियन एक्स्प्रेस' या इंग्रजी वृत्त वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, पुढील काही आठवड्यात भारतीय रिफायनिंग कंपन्यांना कच्च्या तेलाचा पुरवठा करणाऱ्या जहाजांवर अमेरिकेने अलीकडेच बंदी घातली आहे. पाश्चात्य देशांनी निर्धारिक केलेल्या किंमतीपेक्षा रशिया जास्त किंमतीने तेल निर्यात करत होते. पाश्चात्य देशांकडून रशियन तेलाची किंमत प्रति बॅरल 60 डॉलर आहे, त्यामुळे शुक्रवारी अमेरिकेने 14 रशियन तेल जहाजं काळ्या यादीत टाकली आहेत.

भारतात येणाऱ्या तीन जहाजांपैकी एक जॉर्जी मास्लोव्ह या आठवड्याच्या शेवटी सिक्का बंदरावर पोहोचेल. त्याचवेळी आणखी एक जहाज अनातोली कोलोडकिनही एप्रिलमध्ये सिक्का बंदरात पोहोचेल. या महिन्याच्या सुरुवातीलाच अनातोली कोलोडकिन या जहाजाने वाडीनार बंदरात कच्चे तेल पोहोचवले होते. एनएस कॅप्टन हे आणखी एक ब्लॅकलिस्ट जहाज मार्च आणि एप्रिलमध्ये तेलासह वाडीनार बंदरात पोहोचणार आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काळ्या यादीत टाकलेल्या तेलाच्या जहाजांची डिलिव्हरी सरूच आहे. मात्र कोणतीही मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता नसल्याचे उद्योग क्षेत्रातील सूत्रांचे मत आहे. कारण अमेरिकेने काळ्या यादीत टाकलेल्या जहाजांना ४५ दिवसांसाठी तेल निर्यात करण्याची परवानगी दिली आहे.

45 दिवसांनंतर जहाजांना डिलिव्हरी करता येणार नाही

अमेरिका आणि G-7 देशांनी संयुक्तपणे डिसेंबर 2022 मध्ये रशियन तेलावर किंमत मर्यादा लागू करण्याची घोषणा केली होती. रशिया एका महिन्यात भारताला चार डझन कार्गोची डिलिव्हरी करतो. काळ्या यादीत टाकलेल्या जहाजांच्या ४५ दिवसांनंतर भारतीय रिफाइन कंपन्याना या जहाजांद्वारे तेल आयात करणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed: बीड हादरले! पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या, घरात कुणी नसताना उचललं टोकाचं पाऊल

Maharashtra News Live Update: हिंदू जनआक्रोश मोर्च्यात जाण्याआधी आमदार गोपीचंद पडळकर यांना पोलिसांनी अडवलं

Iran: शक्य तितक्या लवकर इराण सोडा, युद्धविरामानंतर केंद्र सरकारकडून भारतीयांना सूचना जारी; नेमकं काय म्हणाले?

Viral Video: बनाना राइड करताना भयंकर अपघात, पर्यटक उंच उडून समुद्रकिनाऱ्यावर पडले; थरारक VIDEO व्हायरल

Ramai Awas Yojana: या नागरिकांना मिळणार हक्काचं घर, सरकार करणार खर्च; काय आहे रमाई आवास योजना?

SCROLL FOR NEXT