UPSC Job Recruitment  x
देश विदेश

मोठी बातमी! UPSC मध्ये २१३ पदांसाठी मेगा भरती, कुठे अन् कसा कराल अर्ज?

UPSC Job Recruitment : केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे सुमारे २१३ पदांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये लेक्चरर, मेडिकल ऑफिसर, कायदेशीर सल्लागार, वकील अशा पदांचा समावेश आहे.

Yash Shirke

  • UPSC मध्ये २१३ पदांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे.

  • लेक्चरर, मेडिकल ऑफिसर, कायदेशीर सल्लागार, अशा पदांचा समावेश.

  • अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, शुल्क अशी माहिती जाणून घ्या.

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीद्वारे २१३ पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यामध्ये लेक्चरर (उर्दू), मेडिकल ऑफिसर, अतिरिक्त सरकारी वकील, सहाय्यक कायदेशीर सल्लागार, लेखा अधिकारी (Auditor) आणि सहाय्यक संचालक अशा महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १३ सप्टेंबर २०२५ रोजी सुरु झाली आहे. २ ऑक्टोबर २०२५ ही ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, अर्ज प्रिंट करण्याची शेवटची तारीख ३ ऑक्टोबर २०२५ आहे.

भरती मोहिमेच्या अंतर्गत विविध पदांसाठी एकूण २१३ रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. यांपैकी १२५ जागा वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी आहेत. उर्वरित १५ जागा लेक्चर, अतिरिक्त सरकारी वकीलासाठी ५ जागा, सहाय्यक कायदेशीर सल्लागाराठी १६ जागा आणि लेखा अधिकाऱ्यांसाठी ३२ जागा आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

शैक्षणिक पात्रता

कायदेशीर पदांसाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून एलएलबी पदवी असणे आवश्यक आहे. लेक्चरर (उर्दू) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे उर्दूमध्ये पदव्युत्तर पदवी आणि बी.एड असणे आवश्यक आहे. वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे एमबीबीएस पदवी असणे गरजेचे आहे. इतर पदांसाठी, बॅचलर किंवा मास्टर पदवी आवश्यक आहे.

वयोमर्यादा

सामान्य (यूआर) उमेदवारांसाठी अर्ज करण्याची कमाल वय ५० वर्षे आहे, तर ओबीसी उमेदवार ५३ वर्षांपर्यंत अर्ज करू शकतात आणि एससी/एसटी उमेदवार ५५ वर्षांपर्यंत अर्ज करू शकतात. दिव्यांग उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ५६ वर्षे आहे. अर्ज शुल्काबाबत, सर्व सामान्य श्रेणीतील उमेदवारांना २५ रुपये शुल्क भरावे लागेल. महिला, एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fort In Mumbai : गर्दीपासून दूर असलेला मुंबईचा ऐतिहासिक खजिना, खूप कमी लोकांना माहितेय 'हा' किल्ला

वांगणीत चाळ माफियांना दणका; 100 हून अधिक अनधिकृत घरांवर प्रशासनाने फिरवला बुलडोझर

OTT Releases: वीकेंडचा काही प्लॅन नाही? मग घरीच OTT वरच्या 'या' ७ जबरदस्त वेब सिरीजचा आनंद घ्या

Maharashtra News Live Update: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, दोन जखमी

संतापजनक! रूम रिकामी ठेवू पण मराठी लोकांना देणार नाही; मुंबईमध्ये शिंदे कुटुंबाला घर नाकारलं

SCROLL FOR NEXT