UPI Service Saam Tv
देश विदेश

UPI : श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये सुरू होणार UPIसेवा; पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणार लॉन्च

UPI Service : श्रीलंका आणि मॉरिशस या देशात आता युपीआय सेवा चालू होणार आहे. यामुळे प्रत्येक विभागातील लोकांना जलद आणि अखंडपणे डिजिटल व्यवहारांचा फायदा होईल. तसेच देशांमधील डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढेल.

Bharat Jadhav

UPI service In Sri Lanka and Mauritius:

श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) सेवा सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ही सेवा या दोन्ही देशात लॉन्च करतील. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदी ही सेवा लॉन्च करतील. यावेळी श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ हेही उपस्थित राहणार आहेत.(Latest News)

भारत फिनटेक इनोव्हेशन आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये खूप वेगाने प्रगती करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भागीदार देशांसोबत फिनटेक नवकल्पना शेअर करण्यावर अनेकवेळा भर दिलाय. तिन्ही देशांच्या या निर्णयाकडे त्याचाच नजरेतून पाहिले जात आहे.

ही युपीआयची सेवा श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांसाठी तसेच भारतात प्रवास करणाऱ्या मॉरिशसच्या नागरिकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. मॉरिशसमधील RuPay कार्ड सेवांचा विस्तार मॉरिशसमधील RuPay व्यवस्थेवर आधारित कार्ड जारी करण्यास मॉरिशसच्या बँकांना सक्षम करेल. भारत आणि मॉरिशस या दोन्ही ठिकाणी व्यवहारांसाठी RuPay कार्डचा वापर सुलभ होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : काल एक गद्दार बोलला जय गुजरात. किती लाचारी. - उद्धव ठाकरेंचा शिंदेंना जोरदार टोला

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Metro In Dino Cast Fees: रोमँटिक म्युझिकल ड्रामा 'मेट्रो इन डिनो' चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती?

SCROLL FOR NEXT