Crime Saam Tv News
देश विदेश

Crime News: क्रुरता! गणवेश घालून आली नाही, शिक्षकेला राग अनावर; पँट काढायला लावली अन् वर्गात बसवलं

Teacher Punishment Controversy: गणवेश घालून न आल्यामुळे शाळेतील शिक्षकेनं एका विद्यार्थीनीसोबत लज्जास्पद कृत्य केलं आहे. ज्यामुळे गावभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

Bhagyashree Kamble

गणवेश घालून न आल्यामुळे शाळेतील शिक्षकेनं एका विद्यार्थीनीसोबत लज्जास्पद कृत्य केलं आहे. तिच्या टीचरनं विद्यार्थीनीला पँट काढून वर्गात बसायला सांगितलं आहे. माहिती मिळताच कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेत शिक्षकेवर कारवाईची मागणी केली आहे.

हे प्रकरण उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील औरंगाबाद पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर परिसरातून शिक्षकेविरूद्ध संताप व्यक्त करण्यात येत आहे.

औरंगाबाद पोलीस स्टेशन परिसरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत एका शिक्षकेकडून लज्जास्पद कृत्य घडलं आहे. पहिलीत शिकणारी एक विद्यार्थी गणवेश न घालता काळी पँट घालून शाळेत गेली होती. यावर महिला शिक्षका संतापली. तिने थेट विद्यार्थीनीला तिची पँट काढून वर्गात बसायला सांगितलं.

कुटुंबातील सदस्यांनी घातला गोंधळ

शाळेतून सुटल्यानंतर विद्यार्थीनी घरी केली. घरी पोहोचल्यानंतर विद्यार्थीनीने कुटुंबातील सदस्यांना याची माहिती दिली. संतप्त कुटुंबातील सदस्यांनी थेट शाळा गाठली. नंतर प्रचंड गोंधळ घातला. कुटुंबातील सदस्यांनी नंतर कोतवाली पोलीस ठाणे गाठत शिक्षकेविरूद्ध तक्रार दाखल केली आहे.

शाळेच्या मुख्याध्यापकांनी मागितली माफी

विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून शाळेच्या मुख्यध्यापकांनी कुटुंबाची माफी मागितली आहे. तसेच कुटुंब शाळा व्यवस्थापनावर कारवाई करण्याच्या मागणीवर ठाम आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. या प्रकरणाची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर शिक्षकेविरूद्ध संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT