Purvanchal Expressway ambulance accident latest news 
देश विदेश

Accident : एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, जवानाचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा चक्काचूर; ४ जणांचा दुर्दैवी अंत

Expressway Accident death : उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर शहीद जवानाचे पार्थिव घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा उभ्या ट्रकला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत रुग्णवाहिकेतील चार जणांचा मृत्यू झाला असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुःख व्यक्त केले आहे.

Namdeo Kumbhar

Purvanchal Expressway ambulance accident latest news : उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर एक अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण अपघाताची घटना घडली. लडाखमध्ये शहीद झालेल्या एका जवानाचे पार्थिव घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की रुग्णवाहिकेचा अक्षरशः चक्काचूर झाला. या भीषण अपघातात रुग्णवाहिकेत असलेल्या चार जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

४ जणांचा जागीच मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णवाहिकेत शहीद जवानाच्या मृतदेहासोबत त्यांचे नातेवाईक आणि चालक प्रवास करत होते. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक आणि महामार्ग पोलिसांची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. मात्र, तोपर्यंत रुग्णवाहिकेतील चार जणांचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ बचावकार्य सुरू करून मृतदेह बाहेर काढले. मृतदेह पोस्टमार्टमसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून पुढील तपास केला जात आहे.

जवानाच्या पार्थिवासोबत दुर्दैवी प्रसंग

शहीद जवानाचे पार्थिव लडाखहून विमानाने आणल्यानंतर पुढे त्याच्या मूळ गावी पोहोचवण्यासाठी रुग्णवाहिकेने नेले जात होते. मात्र, वाटेतच हा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात घडला. या घटनेमुळे शहीद जवानाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात अत्यंत शोकाकूल वातावरण पसरले आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून दुःख व्यक्त

या भीषण अपघाताची दखल घेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या नातेवाईकांप्रती तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी स्थानिक प्रशासनाला घटनास्थळी पोहोचून मदतकार्य वेगात करण्याचे आणि आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत. उभा असलेला ट्रक कोणाचा होता आणि अपघात नेमका कसा घडला? याचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी: भाजपकडून शिक्षक-पदवीधरसाठी उमेदवारांची यादी जाहीर! नागपूर, पुण्यातून 'हे' चेहरे मैदानात

Maharashtra News Live Update: देश ज्ञानेश कुमार यांच्या बापाचा आहे का ? - उद्धव ठाकरे

MLC Election: विधानपरिषदेच्या जागांवरून महायुतीत रस्सीखेच; मविआतही नाराजी?

BP Medicine : ब्लड प्रेशरची औषधं आयुष्यभर घ्यावी लागतात का?

Political News : निवडणुकीआधी विद्यमान आमदाराची हाकालपट्टी, या पक्षाने नेत्यावर का केली कारवाई?

SCROLL FOR NEXT