UP Kanwariyas Saam Tv
देश विदेश

UP Kanwariyas: हायटेन्शन वायरचा शॉक लागून ५ कावड यात्रेकरूंचा मृत्यू; संतप्त भाविकांनी रस्ता अडवला

उत्तर प्रदेशच्या मेरठमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. हायटेन्शन वायरचा शॉक लागून ५ कावड यात्रेकरूंना मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशच्या मेरठमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. हायटेन्शन वायरचा शॉक लागून ५ कावड यात्रेकरूंना मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेने मेरठमध्येच एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये हायटेन्शन वायरच्या संपर्कात येऊन मोठी दुर्घटना घडली आहे. या कावड यात्रेकरूंच्या डीजे ट्रॉलीच्या गाडीवर हायटेन्शन वायर अडकली. त्यामुळे कावड यात्रेकरूंना वीजेचा धक्का बसला. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला तर काही भाविक जखमी झाले आहेत.

या भयंकर दुर्घटनेनंतर अनेक भाविकांनी संतप्त भूमिका घेतली. त्यानंतर काही यात्रेकरूंनी रस्ता अडवला. या दुर्घटनेनंतर अनेकांनी वीज अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले.

नेमकं काय घडलं?

मेरठच्या राली चौहान गावात के कावड यात्रेकरू शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास कावड घेऊन पोहोचले होते. त्यावेळी डीजेही जोरदार वाजत होता. या कावड यात्रेकरूंनी गावात प्रवेश केला, त्यावेळी डीजे ट्रोलीवर गावातील हायटेन्शन वायर पडली. यामुळे हायटेन्शन वायरचा शॉक लागून ५ जणांचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला. गावातील लोक यानंतर जखमी कावड यात्रेकरूंना घेऊन रुग्णालयात घेऊन गेले. गावकऱ्यांनी रुग्णालयात १२ जखमी कावड यात्रेकरूंना दाखल केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: इंदापूरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ, 17 हुन अधिक नागरिकांचा घेतला चावा

Famous Actress Death : प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; पुण्यात घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीत शोककळा

Home Loan : होम लोन घेणाऱ्यांना जोरदार झटका! देशातील सर्वात मोठ्या बँकेनं वाढवले गृहकर्ज व्याजदर, EMI वाढणार

Sunday Horoscope : आनंदात, मौजमजा करण्यात जाणार या ३ राशींचा दिवस, वाचा रविवारचे राशीभविष्य

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर मोठा अनर्थ टळला, लँडिंगवेळी विमानाचा भाग रनवेला धडकला

SCROLL FOR NEXT