UP IAS TRANSFER saam tv
देश विदेश

4 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मुख्यमंत्र्यांनी केले 48 तासांत रद्द; प्रशासनात खळबळ, नेमकं काय घडलं?

Government Cancels Transfer Orders of Four IAS Officers Within 48 Hours: उत्तर प्रदेशात 38 IAS अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर अवघ्या 48 तासांत पुन्हा फेरबदल करण्यात आले आहेत. शैलेंद्र कुमार सिंह, प्रतिभा सिंह, शत्रोहन वैश्य आणि वंदना त्रिपाठी यांच्या बदलीचे आदेश बदलून नव्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

Omkar Sonawane

उत्तर प्रदेशात तीन दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पुन्हा एकदा बदल करण्यात आले आहेत. शैलेंद्र कुमार सिंह, प्रतिभा सिंह, शत्रोहन वैश्य आणि वंदना त्रिपाठी या चार IAS अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात बदल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे 13 नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या 38 IAS अधिकाऱ्यांच्या बदली यादीत या चौघांचाही समावेश होता. मात्र, आता सरकारने यापूर्वीचे काही बदली आदेश रद्द करत या अधिकाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत.

नव्या आदेशानुसार, शैलेंद्र कुमार सिंह यांची बदली रद्द करून त्यांची फिरोजाबादच्या मुख्य विकास अधिकारी (CDO) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर वंदना त्रिपाठी यांची सहारनपूर येथील बदली रद्द करण्यात आली असून, त्यांना राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) च्या अपर आयुक्तपदी नियुक्त करण्यात आले आहे.

IAS प्रतिभा सिंह आणि शत्रोहन वैश्य यांना कोणती जबाबदारी?

प्रतिभा सिंह यांची फिरोजाबाद-शिकोहाबाद विकास प्राधिकरणाच्या उपाध्यक्षपदी (VC) नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी त्यांच्याकडे कानपूर विभागाच्या अपर आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. दुसरीकडे, शत्रोहन वैश्य यांना यमुना एक्स्प्रेस-वे औद्योगिक विकास प्राधिकरणातून (YEIDA) हटवण्यात आले आहे. त्यांची श्रम विभागाच्या विशेष सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

38 IAS अधिकाऱ्यांच्या बदली यादीत चौघांचाही समावेश

13 नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेश सरकारने 38 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले होते. या यादीत या चारही अधिकाऱ्यांची नावे होती. मात्र, आता त्यांच्या नियुक्त्यांमध्ये पुन्हा फेरबदल करण्यात आले आहेत.

शैलेंद्र कुमार सिंह: यमुना प्राधिकरणातून अलीगढचे मुख्य विकास अधिकारी करण्यात आले होते. आता त्यांची फिरोजाबादच्या CDO पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रतिभा सिंह: कानपूर विभागाच्या अपर आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. आता त्यांना फिरोजाबाद-शिकोहाबाद विकास प्राधिकरणाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

शत्रोहन वैश्य: फिरोजाबादच्या CDO पदावरून त्यांची यमुना प्राधिकरणात बदली करण्यात आली होती. आता त्यांना श्रम विभागाचे विशेष सचिव बनवण्यात आले आहे.

वंदना त्रिपाठी: नोएडा प्राधिकरणातून त्यांची सहारनपूर विभागाच्या अपर आयुक्तपदी बदली करण्यात आली होती. मात्र, आता हा बदली आदेश रद्द करण्यात आला आहे.या फेरबदलामुळे उत्तर प्रदेशातील प्रशासकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिव येथील शेतकरी आंदोलनाला गालबोट, माध्यम प्रतिनिधींना पोलिसांची धक्काबुक्की

RBI Bank : RBI चा फायनान्स कंपन्यांना मोठा दणका; ६३ कंपन्यांचे परवाने रद्द

जळगाव जिल्हा बँकेत मोठा उलटफेर, ऐनवेळी भाजपच्या माघारीनं राष्ट्रवादीच्या उमेदवाराची बिनविरोध निवड

Chandrakor Saree Design: लग्नसमारंभात मिळवा रॉयल मराठमोळा लूक! ट्राय करा चंद्रकोर साडीच्या या ७ हटके डिझाइन्स

Government Scheme : सुकन्या समृद्धी योजनेत दरमहा 2,000 जमा केल्याने मिळतील 11 लाखांहून अधिक रुपये; पाहा संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT