A viral video from Uttar Pradesh’s Shamli district Saam Tv
देश विदेश

Doctor Dance Video: दम दम दम मस्त है! सरकारी रुग्णालयात डॉक्टरचा बनियानवर महिलेसोबत डान्स; व्हिडिओ व्हायरल, मॅटर मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलं

Shamli CHC Doctor: सरकारी रुग्णालयातील डॉक्टरचा होणाऱ्या पत्नीसमवेत डान्स करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Omkar Sonawane

सरकारी रुग्णालयातील डॉक्टरचा महिलेसोबत डान्स करणारा व्हिडिओ जोरदार व्हायरल.

व्हिडिओ व्हायरल होताच डॉक्टरला खोली रिकामी करण्याचे आदेश, तसेच ट्रान्सफरची प्रक्रिया सुरू.

डॉक्टर व महिलेनेच सेल्फी कॅमेरातून व्हिडिओ शूट केल्याचा अंदाज.

कॉन्ट्रॅक्टवर नियुक्त डॉक्टरवर कारवाई; प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवली.

उत्तर प्रदेशातील शामली येथील सरकारी रुग्णालयातील एका डॉक्टरचा डान्स करतानाचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये डॉक्टर एका महिलेबसोबत डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर डॉक्टरकडून तातडीने खोली रिकामी करून घेण्यात आली असून त्याच्या ट्रान्सफरची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. हा प्रकार कांधला पोलीस ठाणे क्षेत्रातील सरकारी हॉस्पिटलचा आहे. संबंधित महिला ही त्या डॉक्टरची होणारी बायको असल्याचे सांगितले जात आहे.

व्हिडिओ स्वतःनेच शूट केल्याचा अंदाज

व्हायरल व्हिडिओ हा सरकारी हॉस्पिटलच्या निवासी क्वार्टरचा असल्याचे स्पष्टपणे दिसते. हा व्हिडिओ बघून असे वाटते की डॉक्टर आणि त्याच्या होणाऱ्या बायकोनेच हा व्हिडिओ सेल्फी कॅमेराने शूट केला असावा. मात्र, तो व्हायरल कोणी केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

कंत्राटी पद्धतीवर झाली होती नियुक्ती

या रुग्णालयात बऱ्याच दिवसांपासून मनुष्यबळाची कमतरता होती. त्यामुळे दोन वर्षांच्या करारावर अनेक डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली होती. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या डॉक्टरची नियुक्ती देखील कॉन्ट्रॅक्टवर झाली होती. आता या डॉक्टरचं ट्रान्सफर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्याच्याकडून या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण मागण्यात आले होते. मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या संदर्भातील संपूर्ण अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला असून त्यावरून पुढील कारवाई होणार आहे.

29 ऑक्टोबर रोजी शामली सामुदायिक आरोग्य केंद्रात अधीक्षक कार्यालयातील अंदाजे पाच लाख रुपयांची चोरी झाल्याची घटना समोर आली होती. पोलिसांकडून कोणतीही कारवाई न झाल्यामुळे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी कोतवाली पोलीस ठाण्याबाहेर आंदोलने केली होती. याच आंदोलनामुळे जवळपास दोन तास ओपीडी सेवा बंद राहिल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चारकोप गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना ‘फिल्मी स्टाईल’ अटक

Saturday Horoscope: जितके प्रयत्न तितके यश, ५ राशींवर पैशांचा पाऊस, वाचा शनिवारचे राशीभविष्य

बड्या-बड्या नेत्यांशी थेट पंगा ते धर्मांतराला विरोध; गोपीचंद पडळकरांची Exclusive मुलाखत पाहा|VIDEO

Tomato Rice Recipe: जेवणासाठी बनवा हॉटेल सारखा चमचमीत टोमॅटो भात, खाणारे खातच राहतील

Maharashtra TET: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा होणार रविवारी; CCTV कॅमेरे,फिंगर प्रिंट स्कॅनिंग, बायोमेट्रिक परीक्षा केंद्रावर तगडी व्यवस्था

SCROLL FOR NEXT