UP Crime Saam Tv
देश विदेश

UP Crime: मोबाईल चालवण्यास केला मज्जाव; फौजदार नवऱ्यानं गर्भवती पत्नीवर झाडल्या ३ गोळ्या

UP Crime: झाँसीमध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या गर्भवती पत्नीवर ३ गोळ्या झाडल्या.

Bharat Jadhav

UP Crime:

उत्तर प्रदेशातील झाँसीमध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या गर्भवती पत्नीवर ३ गोळ्या झाडल्या. यात महिला गंभीर जखमी झाली असून तिला झाँसीच्या मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या फौजदाराच्या कृत्यामुळे पोलिीस विभागात खळबळ माजली आहे.

आरोपी पोलीस उपनिरीक्षकाचं नाव शशांक मिश्रा आहे. तर शालिनी मिश्रा असं त्याच्या पत्नीचे नाव आहे. शशांक मिश्रा हे झाँसी येथील उल्दनच्या बंगरा येथील पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. बंगरा येथे ते दोघे राहतात. दोन वर्षापूर्वीच या दोघांचं लग्न झालं होतं. दरम्यान शालिनी मिश्रा यांच्या घरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शशांक मिश्रा आणि शालिनी यांच्या लग्नासाठी त्यांनी ४० लाख रुपये खर्च केले होते. (Latest News)

तरीही शशांक लग्नानंतर त्यांच्याकडून अतिरिक्त हुंडाची मागणी करत होता. या कारणावरून या दोघांमध्ये वाद होत होता. याच कारणावरुन रविवारी शशांक आणि शालिनीचे भांडण झाले. त्यावेळी शशांकने आपल्या सरकारी पिस्तूलने तीन गोळ्या झाडल्या. यात शालिनी गंभीर जखमी झाली आहे.

शालिनीने सांगितल्यानुसार, शशांक झाँसीमध्ये आपली आई आणि भावाला भेटण्यासाठी गेला होता. तेथून तो रात्री साडेअकरा वाजता बंगराला परतला. त्यानंतर फोन करू लागला. त्यावेळ गर्भवती असलेली शालिनीने त्याला फोन वापरू नका असं सांगितलं. त्यावेळी शशांकने घरातील कपाटात ठेवलेली बंदूक काढली आणि माझ्यावर तीन गोळ्या झाडल्या.

या गोळीबारात शालिनी यांना एक गोळी दोन्ही हाताला लागली. तर एक गोळी कंबरेला लागली. यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. जखमी झाल्यानंतर त्या जीव वाचवण्यासाठी शेजारच्या घराकडे धावल्या. त्यानंतर शेजारच्यांनी तिला झाँशीच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल केले. दरम्यान शालिनीचे कुटुंबियांनी पोलीस उपनिरीक्षक शशांकच्या आई-वडिलांवर अनेक गंभीर आरोप करत आहेत. शालिनीच्या आईने सांगितले की, त्यांनी हुंडा म्हणून २५ लाख रुपये रोख दिले. ५० अंगठ्या मागितल्या त्या दिल्या नव्हत्या शशांक संतापला होता.

शालिनीला सासरवास होत आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर पोलीस अद्याप काहीही बोलण्याचे टाळत आहेत. तब्बल 9 तासांनंतर पोलिसांनी निरीक्षकाला ताब्यात घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : तिहेरी हत्याकांड! १६ वर्षांच्या मुलाने भाऊ-वहिनीची केली निर्घृण हत्या, ३ वर्षांच्या पुतण्यालाही सोडलं नाही

kalsubai peak : महाराष्ट्राचे एव्हरेस्ट! कळसूबाई शिखराला 'कळसू' हे नाव कसं पडलं? कारण वाचून थक्क व्हाल

Nashik Vidhan Parishad: एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, बंडखोर गीतेंचा दणदणीत विजय; दराडेंचा भाजपवर गंभीर आरोप

Maharashtra News Live Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

Vat Purnima 2026 : वटपौर्णिमेचा सण 'या' पदार्थाशिवाय अपूर्ण, फक्त १० मिनिटांत बनेल आंब्याची स्पेशल रेसिपी

SCROLL FOR NEXT