ETAWAH RAPE CASE: NEPHEW ACCUSED OF ASSAULTING MARRIED WOMAN Saam Tv
देश विदेश

Shocking : नवरा कामावर बायको घरात एकटी, भाच्याने संधी साधली; रात्री बेडरूममध्ये घुसून मामीवर केला बलात्कार

Uttar Pradesh Crime News : इटावा जिल्ह्यात एका विवाहित महिलेवर तिच्याच भाच्याने अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून आरोपी फरार आहे.

Alisha Khedekar

  • इटाव्यात नात्याला काळीमा फासणारी घटना उघड

  • भाच्याकडून विवाहित महिलेवर अत्याचाराचा आरोप

  • पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली

  • आरोपी फरार असून पोलिसांचा शोध सुरू

  • घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

इटावा जिल्ह्यातील बलराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेवर तिच्याच भाच्याने जबरदस्ती बलात्कार केला असल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित आरोपी हा तिचा भाचा असून, ओळखीचा असल्यामुळे त्याचा घरात वावर होता. घटनेच्या दिवशी रात्री उशिरा आरोपीने घरात प्रवेश केला आणि परिस्थितीचा गैरफायदा घेत पीडितेवर बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. या वेळी घरी कोणीही नसून घरात फक्त महिला आणि तिची दोन लहान मुलेच होती, असं महिलेने तक्रारीत म्हटले. दरम्यान घटनेवेळी पीडितेचा पती गुजरातमध्ये कामाच्या निमित्ताने गेला होता.

महिलेने सांगितले की, घटनेनंतर तिने तत्काळ धैर्य दाखवत पोलिसांशी संपर्क साधला आणि संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. तिच्या तक्रारीच्या आधारे बलराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. सध्या पोलिस आरोपीचा शोध घेत असून, लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणाचा तपास अत्यंत गांभीर्याने केला जात असून, सर्व पुरावे आणि साक्षींच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी महिलांच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajya Sabha Election : राज्यसभेच्या १० जागांसाठी निवडणुका होणार, भाजपला झटका बसण्याची शक्यता, कसं असेल गणित?

Maharashtra News Live Update: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे पुणे जिल्ह्यातील आज पीक परिस्थिती पाहणी दौरा करणार

Rain Alert: पुढचे ८ तास महत्वाचे! महाराष्ट्रासह १३ राज्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, राज्यात कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Tea Or Coffee Drinking Tips: नाश्त्याआधी की नाश्त्या नंतर, सकाळी चहा-कॉफी कधी प्यावी? जाणून घ्या

दुष्काळावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं; शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार?

SCROLL FOR NEXT