UP Election  Saam TV
देश विदेश

UP By-election 2022: डिंपल यादव यांचा मोठ्या फरकाने विक्रमी विजय, भाजप उमेदवार जवळपासही नाही

मैनपुरीमध्ये डिंपल यादव यांना 617625 मतं मिळाली, तर भाजप उमेदवार रघुराज सिंह शाक्य यांना 329489 मतं मिळाली.

प्रविण वाकचौरे

UP By-election 2022 : उत्तर प्रदेशच्या मैनपुरी पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाने मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. सपा उमेदवार डिंपल यादव यांनी भाजप उमेदवार रघुराज सिंह शाक्य यांचा जवळपास तीन लाख मतांनी पराभव केला आहे.

मैनपुरीमध्ये डिंपल यादव यांना 617625 मतं मिळाली, तर भाजप उमेदवार रघुराज सिंह शाक्य यांना 329489 मतं मिळाली. म्हणजेच 288461 एवढ्या मोठ्या मतांच्या फरकाने डिंपल यांनी आपला विजय नोंदवल आहे.

मुलायम सिंह यादव यांच्या मृत्यूनंतर ही लोकसभेची जागा रिक्त झाली होती. डिंपल यांच्या विजयामुळे आता मुलायम सिंह यांचा वारसा त्या पुढे नेणार हे स्पष्ट होत आहे. (Election 2022

मुलायम सिंह यादव यांनी 2019 मध्ये निवडणूक लढली त्यावेळी त्यांनी 94 हजार मतांच्या फरकाने विजय नोंदवला होता. मात्र डिंपल यादव यांनी यावळे तिप्पट फरकाने हा विजय साजरा केला आहे. डिंपल यांना शिवपाल सिंह यादव यांचा पाठिंबा मिळाल्याने डिंपल यांचा हा विजय अधिक सोपा झाला.  (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वहिनीला मिळवण्यासाठी सख्ख्या भावाचा काटा; हत्या केल्यानंतरही चेहऱ्यावर हसू,'त्या' क्रूर कृत्याने पोलीसही चक्रावले

Maharashtra News Live Update: एकही खासदार कुठंही जाणार नाही, शिंदेगटाच्या नेत्याच्या दावा

Pune Crime: क्षुल्लक कारणांवरून वाद; पुण्यात रागाच्या भरात पतीनं पत्नीला संपवलं, दीड महिन्यांच्या चिमुकल्यापासून आईचं छत्र हरपलं

बीडमध्ये पुन्हा अपहरणाचा थरार; दिवसाढवळ्या तरुणाला कारमध्ये बसवून पळवलं, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Push-Ups Fitness Test: तुमच्या वयानुसार किती पुश-अप्स मारले पाहिजेत? तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती, वाचा

SCROLL FOR NEXT