Uttar Pradesh Tractor Trolley Accident Saamtv
देश विदेश

UP Accident News: हृदयद्रावक घटना! भाविकांनी भरलेला ट्रॅक्टर तलावात उलटला; १५ जणांचा मृत्यू

Uttar Pradesh Tractor Trolley Accident: या भीषण अपघाताची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दखल घेतली आहे. योगी यांनी मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे. तसेच अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला गती देण्याचे निर्देश दिले आहेत.

Gangappa Pujari

Kasganj Tractor Trolley Accident:

उत्तरप्रदेशमधून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशच्या कासगंजमध्ये माघ पौर्णिमेनिमित्त गंगेत स्नान करण्यासाठी गेलेल्या भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली तलावात उलटली. या दुर्घटनेत १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भयंकर अपघाताच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, उत्तर प्रदेशातील कासगंजमध्ये माघ पोर्णिमेनिमित्त देवाला निघालेल्या भाविकांनी भरलेला ट्रॅक्टर तलावात पलटी झाला. या दुर्घटनेत १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये आठ महिला आणि काही लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले.

अनेक गंभीर जखमी भाविकांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून काहींना पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे. घटनास्थळी डीएम, एसपी आणि इतर प्रशासकीय आणि पोलिस अधिकारी पोहोचले असून सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे. या दुर्दैवी घटनेने मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, या भीषण अपघाताची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दखल घेतली आहे. योगी यांनी मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे. तसेच अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. जखमींवर योग्य उपचार करण्याची व्यवस्था करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Prepaid Plan: खुशखबर! 200GB डेटा आणि 90 दिवसांची वैधता अन्...; Jio युजर्ससाठी 'ही' खास ऑफर माहितीये का?

Accident News : कल्याणमध्ये अपघाताचा थरार! रिंग रोड बनला स्टंटबाजांचा अड्डा, भरधाव कार व्यवसायिकाला धडकली

Maharashtra Live News Update: संत गाडगे महाराज यांच्या 150 व्या जयंती दिनी त्यांच्या पुतळ्याचे पालिका आवारात करण्यात आले भूमिपूजन

करोडपती बनायचंय मग PPF मध्ये करा गुंतवणूक; आयुष्यभर दरमहा मिळतील 61,500 पेन्शन

Viral Video: जगातील सर्वात सुंदर व्हिडिओ, मुलाने पहिल्यांदा विमानात बसवलं; माऊलीच्या डोळ्यांतून वाहू लागले सुखाचे अश्रू

SCROLL FOR NEXT