Accident News saam tv
देश विदेश

UP Accident News : अत्यसंस्कारासाठी निघाले, पण रस्त्यातच मृत्यूनं गाठलं; ट्रक-कारच्या धडकेत ५ जणांचा मृत्यू

Uttar Pradesh News : भरधाव वेगाने जाणारा ट्रक आणि कार यांच्यात ही धडक झाली.

साम टिव्ही ब्युरो

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशमध्ये भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीआहे. फतेहपूर जिल्ह्यात हुसेनगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेरा गाधिवाजवळ ही घटना घडली. कुटुंबातील सदस्याच्या अंत्यसंस्कारासाठी सर्वजण कारने जात होते. दरम्यान भरधाव ट्रक आणि कारची समोरासमोर धडक होऊल हा अपघात झाला.

भरधाव वेगाने जाणारा ट्रक आणि कार यांच्यात ही धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. विजय रानिया, गोरेलाल, सुदामिया, दयाशंकर आणि प्रमोद अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व जण एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी हुसैनगंज हद्दीतील जमरानवा गावात जात होते. (Mumbai News)

सोमवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास ओव्हरटेक करत असताना कार समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. या अपघातात कारमधील दाम्पत्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. डीएम श्रुती, एसपी उदय शंकर सिंह घटनास्थळी पोहोचले. फॉरेन्सिक टीमही तपासासाठी पोहोचली. (Latest News)

गाझीपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पैगंबरपूर बकरी गावात राहणारे दयाशंकर (70) यांचे नातेवाईक के रामपाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दयाशंकर यांची पत्नी ब्रिजरानी (65), भाऊ गोरेलाल (60), सुदामिया (55) प्रमोद यादव (35) अशी मृतांची नावं आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT