Uddhav Thackeray and Rahul Gandhi meet before india alliance meeting 
देश विदेश

Maharashtra Politics : विषय महाराष्ट्राचा, दिल्लीत चर्चा; राहुल गांधी-उद्धव ठाकरे यांच्यात नेमकं काय ठरलं?

Uddhav Thackeray and Rahul Gandhi meet before india alliance meeting : इंडिया आघाडीच्या बैठकीआधीच राज्यातील राजकीय घडामोडीवरून काँग्रेसचे वरिष्ठ नेते, खासदार राहुल गांधी आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली.

Vishal Gangurde

प्रमोद जगताप, दिल्ली

Uddhav Thackeray and Rahul Gandhi Meeting:

साडे तीन महिन्यानंतर आज मंगळवारी सायंकाळी इंडिया आघाडीची चौथी बैठक पार पडली. आगामी लोकसभा निवडणुकीतील जागा वाटप आणि जाहीरनाम्याबाबत चर्चा झाली. या इंडिया आघाडीच्या बैठकीआधीच राज्यातील राजकीय घडामोडीवरून काँग्रेसचे वरिष्ठ नेते, खासदार राहुल गांधी आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली. (Latest Marathi News)

राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे कालपासूनच दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे यांनी काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. त्यानंतर आज मंगळवारी इंडिया आघाडीच्या बैठकीआधी राहुल गांधी यांची भेट घेतली.

इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे बैठक झाली. या बैठकीवेळी संजय राऊत, आदित्य ठाकरे देखील बैठकीला उपस्थित होते. तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे देखील बैठकीला उपस्थित होते. दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये बैठक झाली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बैठकीत काय चर्चा झाली?

इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात अंदाजे २० मिनिटे चर्चा झाली. या बैठकीत राज्यातील महाविकास आघाडीबाबत चर्चा झाली. राज्यात महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्षांनी राज्यात एकत्र काम करावं, असा मुद्दा राहुल गांधींनी बैठकीत मांडला. तसेच यावेळी आगामी लोकसभेसाठी तिन्ही पक्षात आपापसात कसा समन्वय राहील, यावर देखील चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT