chhatrapati shivaji maharaj, Udayanraje Bhosale, satara saam tv
देश विदेश

Udayanraje Bhosale Live : उदयनराजे- माेदी भेटीनंतर राजे म्हणाले...

आज दिल्लीत उदयनराजे आणि राज्यसभेच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची भेट घेतली.

Siddharth Latkar

Udayanraje Bhosale Live : खासदार उदयनराजे भाेसले (Udayanraje Bhosale) यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र माेदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. त्यानंतर आयाेजिलेल्या पत्रकार परिषदेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्रात (maharashtra) हाेणारा अवमानाबद्दल माेदींच्या कानावर गेल्याचे राजेंनी सांगितलं. माझं जे मत आहे तेच राज्यातील सर्व नेत्यांचे मत असल्याचे राजेंनी काेश्यारी हटावच्या प्रश्नावर माध्यमांना उत्तर दिले.

उदयनराजे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल तसेच अन्य महापुरुषांबाबत महाराष्ट्रात अवमानकारक वक्तव्य हाेत असल्याने राज्यातच नव्हे तर देशात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. ही बाब पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या कार्यालयापर्यंत देखील पाेहचली आहे.

हा काेणत्याही आघाडीचा किंवा पक्षाचा विषय नाही. हा राजकीय विषय नाही. देशातील सर्व शिवभक्त नाराज आहेत. त्यामुळे प्रत्येकाची भावना जी माझी आहे तीच सर्वांची आहे. आम्ही रायगडावर देखील जाऊन आमची भुमिका मांडली. हे चालतं असे जर काेणाला वाटत असेल तर ते चांगले लक्षण नाही. राष्ट्रपती यांच्यापर्यंत सर्वबाबी पाेहचल्या आहेत. त्याची दखल घेतली जाईल अशी मला खात्री आहे असेही उदयनराजेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ram Charan Bodyguard : सलमानच्या शेरानंतर राम चरणच्या बॉडीगार्डची चर्चा; उत्साही चाहत्याला एका झटक्यात बाजूला केलं, 'केविन कुंटा' आहे तरी कोण?

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये भीषण अपघात, २ जणांचा मृत्यू

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! २ लाखांपर्यंतचे कर्जमाफ; पण कुणाला मिळणार लाभ? राज्य सरकारच्या योजनेत नेमकं काय?

Weather Update : मोठी बातमी! अखेर 'तो' क्षण आला; पुढील काही तासांत मान्सून धडकणार, 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Mumbai Rain : वरुणराजाचं थाटात आगमन! मुंबई-उपनगरात काळे ढग दाटले, मुसळधार पाऊस सुरू

SCROLL FOR NEXT