Miami Airport plane collision saam tv
देश विदेश

दोन विमान एकमेकांना धडकले; 166 प्रवासी अन्... भीषण अपघाताने खळबळ

Two Planes Collide At Miami International Airport: अमेरिकेतील फ्लोरिडा येथील मायामी इंटरनॅशनल विमानतळावर UPS एअरलाइन्सचे कार्गो विमान आणि कोपा एअरलाईन्सचे प्रवासी विमान एकमेकांना धडकले.

Omkar Sonawane

अलीकडे विमान अपघाताच्या घटना वाढत आहे. एक वर्षापूर्वीच अहमदाबाद एअरपोर्टवर लंडलला जणार विमान मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळले होते. यामध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला होता. तसेच गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा देखील मृत्यू झाला होता. तर विमान अपघातातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ही निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून विमान अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे हवाई प्रवासाच्या सुरक्षेतवेर गंभीर प्रश्न उपस्थित होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

अशातच अमेरिकेत देखील विमानतळावर मोठा अपघात झाला आहे. मायामी विमानतळावर दोन विमानांची धडक झाल्याची घटना समोर आली आहे. फ्लोरिडामधील मायामी इंटरनॅशनल विमानतळावर UPS एअरलाइन्सचे कार्गो विमान आणि कोपा एअरलाईन्सचे प्रवासी विमान एकमेकांना धडकले. या दुर्घटनेत दोन जणांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सुमारे 9 वाजून 15 मिनिटांनी विमानतळावरील दोन टॅक्सीवेच्या जंक्शनवर ही घटना घडली. या धडकेत कोपा एअरलाईन्सच्या बोइंग 737 विमानाच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेनंतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नेमकं काय घडलं?

एक विमान लँड होत असताना दुसरे विमान टेक ऑफ करण्याच्या तयारीत होते, याचवेळी दोन्ही विमानांची टक्कर झाली. मायामी-डेड फायर रेस्क्यू विभागानेही या घटनेला दुजोरा दिला आहे. या घटनेत UPS चे बोइंग ७६७ कार्गो विमान आणि कोपा एअरलाईन्सचे बोइंग ७३७ प्रवासी विमान होते. UPS चे विमान फ्लाइट क्रमांक ३५८ ने मायामीहून कोलंबियातील बोगोटाकडे रवाना होत होते. तर कोपा एअरलाईन्सचे विमान फ्लाइट क्रमांक ४२७ ने पनामा सिटीहून मायामी येथे आले होते.

दरम्यान, कोपा एअरलाईन्सच्या विमानातील एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडिओ शूट केला आहे. या व्हिडिओमध्ये UPS च्या विमानाला धडकल्यानंतर कोपा एअरलाईन्सच्या विमानाच्या पुढील भागाचे झालेले नुकसान दिसत आहे. सोशल मीडियावर या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP Leader Killed: वाद मिटवण्यासाठी गेलेल्या भाजप नेत्याची भरबाजारात हत्या, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: जुहू चौपाटीवर छट पूजेसाठी लाखोंची गर्दी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लावणार उपस्थिती

Satara News: चिठ्ठीत गुडबाय लिहित बँक अधिकाऱ्याची आत्महत्या, २ महिला अधिकाऱ्यांवर गुन्हा

Brown Smokey Eye Makeup: लग्न किंवा पार्टीसाठी हवा हटके लुक? ट्राय करा स्टायलिश ब्राऊन स्मोकी आय मेकअप!

Life Certificate 2026 : पेन्शनधारकांनो सावधान! 30 नोव्हेंबरपूर्वी हे काम करा, अन्यथा खात्यात पैसे येणार नाहीत

SCROLL FOR NEXT