Hardik Patel on Congress, Gujrat Assembly Election news updates, Gujrat news updates Saam TV
देश विदेश

लडूंगा, जितूंगा और मरते दम तक काँग्रेस में रहूंगा; काँग्रेस सोडताच हार्दिक पटेलचं ट्विट व्हायरल

राजीनाम्यानंतर त्यांच दोन वर्षापूर्वीच एक जुन ट्विट व्हायरल होत आहे.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली : गुजरात काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. गुजरात काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. अनेक दिवसांपासून ते पक्षावर नाराज असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु होत्या. गुजरातमधील विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना हार्दिक पटेलच्या (Hardik Patel) राजीनाम्याने काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच दोन वर्षापूर्वीच एक जुन ट्विट व्हायरल होत आहे. हे ट्विट हार्दिक पटेल यांनी २०१९ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर केलं होतं.

"विजय-पराजयामुळे व्यापारी बदलतात, विचारधारेचे अनुयायी नाही, लढणार, जिंकणार आणि मरेपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार." २०२० मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर हार्दिकने हे ट्विट केले होते. या पोटनिवडणुकीत आठही जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव झाला होता.

काँग्रेसचे बडे नेते विकले गेलेत; गंभीर आरोप करत हार्दिक पटेल यांचा राजीनामा

गुजरात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुजरात काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. अनेक दिवसांपासून ते पक्षावर नाराज असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु होत्या. गुजरातमधील विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना हार्दिक पटेलच्या (Hardik Patel) राजीनाम्याने काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. ट्विट करत त्यांनी याबाबद माहिती दिली आहे.

काँग्रेस सोडताना हार्दिक पटेलने ट्विटमध्ये लिहिले की, आज मी धैर्याने काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, मला विश्वास आहे की माझ्या या निर्णयाचे सर्व सहकारी आणि गुजरातमधील लोक स्वागत करतील, मला विश्वास आहे की, या पावलानंतर मी भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन.

हार्दिक पटेलने काँग्रेसवर काय आरोप केले?

काँग्रेसचे बडे नेते विकले गेले आहेत.

काँग्रेस पक्ष देशहिताच्या आणि समाजाच्या हिताच्या विरुद्ध काम करत आहे.

काँग्रेस आता विरोधापुरतेच राजकारण करत आहे.

राममंदिर उभारणी, CAA-NRC, कलम ३७०, आणि जीएसटीच्या अंमलबजावणीत काँग्रेसने विरोधी भूमिका घेतली होती.

देश संकटात असताना आमचे नेते परदेशात होते.

हार्दिक पटेल काही काळापासून ते काँग्रेस नेतृत्वावर नाराज आहेत. अनेकवेळा त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसचे बडे नेते विकले गेलेत, असेही ते म्हणाले आहेत. हार्दिक पटेल यांच्या राजीनाम्यामुळे आता गुजरात काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ऐन गुजरात विधानसभा निवडणुकांपूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur Farmer Protest : शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही, तर रेल्वे बंद करू; बच्चू कडू यांचा फडणवीस सरकारला इशारा, VIDEO

Maharashtra Politics: पक्षानंतर आता पदही सोडलं; अजित पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्यानं दिला राज्यमंत्री पदाचा राजीनामा

Farmer’s Daughter : शेतकरी बापाने आयुष्य संपवलं; लेकीचं पोलीस होण्याचं स्वप्न, महाराष्ट्र पोलीस मदतीला धावले

Kolhapur-Satara Highway: सातारा -कोल्हापूर महामार्गवरील वाहतूक कोंडी फुटणार ; सरकारचा काय आहे प्लान?

Maharashtra Live News Update: जरांगे पाटील बच्चू कडूंना समर्थन देण्यासाठी नागपूरला रवाना

SCROLL FOR NEXT