VS Babu Death News 
देश विदेश

माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव करणाऱ्या आमदाराचं निधन; राजकारणात हळहळ

VS Babu death news today : अभिनेते विजय यांच्या टीव्हीके पक्षाचे कोलाथूरचे आमदार व्ही. एस. बाबू यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. चेन्नईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

Namdeo Kumbhar

VS Babu Death News : थलापती विजय यांच्या टीव्हीके (TVK) पक्षाचे आमदार व्ही. एस. बाबू यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. २०२६ च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत कोलाथुर मतदारसंघातून एम. के. स्टालिन यांचा त्यांनी पराभव केला होता. श्वसनाच्या दीर्घकालीन त्रासामुळे ते ९ सप्टेंबरपासून चेन्नईतील एमजीएम (MGM) रुग्णालयात उपचार घेत होते, मात्र आज दुपारी २.२४ वाजता कार्डिॲक अरेस्टमुळे त्यांची प्राणज्योत मालवली.

बाबू यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

व्ही. एस. बाबू यांना ९ सप्टेंबर रोजी श्वासाच्या त्रासामुळे चेन्नईतील अमिंजिकराई येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाने जारी केलेल्या वैद्यकीय बुलेटिननुसार, व्ही.एस बाबू उपचारासाठी आयसीयूमध्ये दाखल झाले होते. त्यांची प्रकृती सतत खालावत गेली, त्यातच हृदयविकाराचा झटका आला आणि आज दुपारी २:२४ वाजता त्यांचे निधन झाले.

कोण होते व्ही. एस. बाबू?

७५ वर्षीय व्ही. एस. बाबू हे तामिळनाडूच्या राजकारणातील अनुभवी व्यक्तिमत्व होते. कोलाथूर परिसरात त्यांचे मोठे राजकीय स्थान होते. २००६ मध्ये त्यांनी डीएमकेचे उमेदवार म्हणून पुरासवाल्कम मतदारसंघातून एआयएडीएमकेच्या उमेदवाराचा ९०,००० हून अधिक मतांनी पराभव करून प्रचंड विजय मिळवला होता. त्यांनी २००६ ते २०११ पर्यंत आमदार म्हणून काम केले. एम. के. स्टॅलिन यांच्या जवळचे असलेले बाबू यांनी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी डीएमके पक्ष सोडला आणि अभिनेते विजय यांच्या टीव्हीके पक्षात प्रवेश केला व २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत एम. के. स्टॅलिन यांचा पराभव केला.

बाबूंचा ऐतिहासिक विजय

विजय थलपथी यांच्या टीव्हीके पक्षात प्रवेश केल्यानंतर व्ही. एस. बाबूंच्या स्थानिक जनसंपर्कामुळे स्टॅलिनचा अभेद्य किल्ला कोसळला. स्टॅलिनचा पराभव हा डीएमकेसाठी एक मोठा धक्का होता. डीएमकेच्या स्थापनेपासून पक्षाध्यक्ष एम. के. स्टॅलिन आणि सरचिटणीस दुराईमुरुगन हे दोघेही एकत्र विधानसभा निवडणुकीत पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ आहे. २०११, २०१६ आणि २०२१ मध्ये स्टॅलिनला सलग तीन विजय मिळवून देणारी कोलाथूरची जागा, यावेळी बाबूंच्या विजयामुळे त्यांच्या हातून निसटली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! पश्चिम द्रुतगती मार्गावर BMW ने महिलेला चिरडलं, जागीच मृत्यू

Lateef Bhatt : बाप शेतकरी, इंग्लिश मीडियममधून शिक्षण, सुतारकामातून ₹ १३००० कमावणारा लतीफ कसा झाला दहशतवादी?

Style Old Shawl: आजीच्या जुन्या शॉलला द्या मॉडर्न टच! कॉलेज किंवा बाहेर जाण्यासाठी ट्राय करा ५ फॅशनेबल स्टाइल्स

Ayushman Card : आयुष्मान कार्ड असूनही 'या' उपचारांचा खर्च मिळणार नाही, रुग्णालयात जाण्यापूर्वी वाचा महत्त्वाची माहिती

Maharashtra News Live Update: गडहिंग्लज तालुका अखेर दुष्काळग्रस्त घोषित! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वाक्षरी

SCROLL FOR NEXT