Power Supply Saam Tv
देश विदेश

Telangana: शेतकऱ्यांना मोठा धक्का; कृषी वीज पुरवठ्यात कपात..!

येसंगी काढणीच्या अवस्थेत असल्याने विजेचा वापर मोठा होणार नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

साम न्यूज नेटवर्क

तेलंगणा : उन्हाळ्यात (summer season) वाढलेला वीजवापर देशातील विविध राज्यांसाठी अडचणीचा ठरत आहे. महाराष्ट्राबराेबर (maharashtra) आंध्र प्रदेशात (andhra pradesh) देखील वीजेची कपात सुरु झाली आहे. त्यापाठाेपाठ आता तेलंगणा (telangana) राज्यात देखील वीजेच्या कपातीचे संकट घाेंगावत आहे. प्राथमिक टप्प्यात तेलंगणात फक्त शेतीसाठीच्या वीजेची कपात केली जाणार आहे. (telangana power cut latest marathi news)

तेलंगणा सरकार आतापर्यंत शेतकऱ्यांना (farmers) २४ तास मोफत वीज देत आले आहे. आता उन्हाळ्यात वीजेचा वापर वाढल्याने वीज मोठ्या प्रमाणावर खरेदी करावी लागणार आहे. त्यामुळेच तेलंगणा सरकारने सध्याच्या कृषी पुरवठ्यात कपात करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शेतीला दिली जाणारी वीज सात तासांपर्यंत मर्यादित ठेवण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

TSNPDCL ने यापूर्वीच लेखी सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यानुसार सात तासांचे थ्री फेज वीज पुरवठ्याचे वेळापत्रक पाळण्याचे आदेश अधिका-यांना दिले आहेत. तेलंगणात गेल्या अनेक दिवसांपासून वीजटंचाई आहे. त्याच वेगाने मागणी वाढत आहे. त्यामुळे कपात अपरिहार्य असल्याचा दावा अधिकारी करीत आहेत. येसंगी (Yasangi) काढणीच्या अवस्थेत असल्याने विजेचा वापर मोठा होणार नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे आणि त्यामुळे सात तासांपर्यंत घट करण्यात आली आहे. दरम्यान याचा पिकांवर मोठा परिणाम होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office MIS Scheme: पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! नवरा-बायकोला दरमहा मिळणार ₹९,२५०; वाचा संपूर्ण माहिती

Maharashtra News Live Update : अकोला जिल्ह्यात बजाज फायनान्सविरोधात वंचित बहुजन आघाडीचे लोटांगण आंदोलन

Garba Special Blouse Designs: नजरेत भरेल असं सौंदर्य! गरब्यासाठी लेहेंग्यावर उठून दिसतील असे 5 बॅकलेस ब्लाऊज

भाजपला मोठा धक्का! गोपीचंद पडळकरांचा उमेदवारी अर्ज रद्द; राजकारणात खळबळ|VIDEO

Kidney health: तुमच्या किडनीला होऊ शकतो धोका; या ७ वाईट सवयी आताच सोडा, अन्यथा...

SCROLL FOR NEXT