karnataka Accident Saam Tv(Social Media)
देश विदेश

karnataka Accident Video: ट्रक आणि कारचा भीषण अपघात; कारचा झाला चुराडा, ७ जणांचा मृत्यू

karnataka Accident: गुडाच्या जंगलाजवळील महामार्गावर ट्र्क आणि कारचा भीषण अपघात झालाय.

Bharat Jadhav

Truck and Car Accident :

कर्नाटकातील गुडाच्या जंगलाजवळील महामार्गावर ट्र्क आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका ५ वर्षाच्या मुलीसह ७ जणांचा मृत्यू झालाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी विजयनगर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील गुंडा जंगलाजवळ हा अपघात झाला. येथे मागून येणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली. यात कारमधील ७ जणांचा मृत्यू झाला. यात तीन महिला आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. (Latest News)

कारला धडक देणारा ट्र्क हा चित्रदुर्गाकडून होस्पेटला जात होता. गुडाच्या जंगलाजवळ ट्रक आला असताना ट्रकची स्टेअरिंग लॉक झाली. यामुळे हा ट्रक अनियंत्रित होत विरुद्ध बाजूच्या लेनमध्ये घुसला. त्याचवेळी एक एसयुव्ही कार हरपनहल्लीहून हॉस्पेटच्या दिशेने जात होती. या कारला अनियंत्रित ट्रकची धडक झाली. त्यानंतर एका मागून येणाऱ्या एका ट्रकने त्या कारला मागून धडक दिली. दरम्यान या कारमधून प्रवास करणाऱ्या ७ जणांचा या अपघातात मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मृत पावलेले व्यक्ती होस्पेट येथील उक्कडगात्री या गावाचे आहेत. ते सर्वजण हरपनहल्ली तालुक्यातील कुलाली मंदिरात दर्शनाला गेले होते. दोन्ही ट्रकचे चालक हे गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांना होस्पेटमधील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढला! मुंबईसह ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट; तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज काय?

Maharashtra News Live Update : डॉ. अमोल कोल्हे यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे आग्रही मागणी

भाच्याचा संसार मोडल्याचा प्रचंड राग! जंगलात नेऊन सासऱ्याच्या डोक्यात घातला दगड; पुण्यात हत्येने खळबळ

Mumbai Fire : मुंबईत अग्नितांडव! हायप्रोफाईल सोसायटीचा ११ वा मजला जळून खाक, २ जणांचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई हादरली! मध्यरात्री ३ ते ४ घरांवर दरड कोसळली; २ जणांचा दुर्दैवी मृत्यू, ८जण ढिगाऱ्याखाली

SCROLL FOR NEXT