Odisha Train Accident News Saam TV
देश विदेश

Odisha Train Accident: ओडिशा रेल्वे अपघाताचा परिणाम, रेल्वेचे वेळापत्रक कोलमडलं; या ट्रेन रद्द तर यांच्या मार्गात बदल

Indian Railway: रेल्वे सेवेवर परिणाम झाल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

Priya More

Cancelled Trains List: ओडिशाच्या (Odisha) बालासोरमध्ये शुक्रवारी रात्रीच्या सुमारास मोठा रेल्वे अपघात झाला. दोन ट्रेन आणि एका मालगाडीचा हा अपघात झाला. या भीषण रेल्वे अपघातामध्ये आतापर्यंत 233 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 900 हून अधिक जण जखमी आहेत. घटनास्थळावर बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा रेल्वे अपघात आहे. (latest Marathi News)

कोरोमंडल एक्स्प्रेसने मालगाडीला जोरदार धडक दिली. ही एक्स्प्रेस चेन्नली जात होती. या अपघातादरम्यान या एक्स्प्रेसचे इंजिन मालगाडीवर चढले. त्यानंतर या एक्स्प्रेसच्या पाठीमागचे डबे रुळावरुन घसरुन दुसऱ्या रुळावर पडले. त्याचवेळी या रुळावरुन हावडा-बंगळुरु एक्स्प्रेस येत होती. या एक्स्प्रेसने कोरोमंडल एक्स्प्रेसच्या डब्याला धडक दिली. त्यानंतर या एक्स्प्रेसचे डबे देखील रुळावरुन घसरले. या भीषण अपघातामध्ये तीन्ही ट्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामध्ये मोठ्याप्रमाणात जीवितहानी झाली आहे.

ओडिशामध्ये झालेल्या या भीषण रेल्वे अपघातामुळे रेल्वे सेवाच कोलमडली आहे. याचा परिणाम इतर रेल्वेसेवांवर झाला आहे. या अपघातामुळे लांबपल्ल्याच्या 18 ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच अनेक ट्रेनच्या मार्गामध्ये बदल करण्यात आले आहेत. रेल्वे प्रशासनाकडून या गाड्यांची यादी जारी करण्यात आली आहे. तसंच प्रवाशांच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबर देखील जारी करण्यात आले आहेत. रेल्वे सेवेवर परिणाम झाल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

या भीषण रेल्वे अपघातानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अपघाताबाबत शोक व्यक्त केला आहे. या अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत जाहीर केली आहे. तर गंभीर जखमींना 2 लाख आणि किरकोळ जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी एक दिवसीय राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे 3 जून रोजी संपूर्ण राज्यात कोणताही सण किंवा उत्सव साजरा होणार नाही.

रेल्वे मार्गात बदल केलेल्या ट्रेनची यादी -

ट्रेन नंबर - 22807 जी टाटा जमशेदपूर मार्गाने वळवण्यात आली आहे.

ट्रेन नंबर - 22873 देखील टाटा जमशेदपूर मार्गाने वळवण्यात आली आहे.

ट्रेन नंबर - 18409 देखील टाटा जमशेदपूरच्या मार्गाने वळवण्यात आली आहे.

ट्रेन नंबर - 22817 टाटा जमशेदपूरच्या मार्गाने वळवण्यात आली आहे.

ट्रेन नंबर - 15929 ही ट्रेन भद्रक येथे परत बोलावण्यात आली आहे.

ट्रेन नंबर - 12840 चेन्नई सेंट्रल - हावडा सध्या खरगपूर विभागातील जरोली मार्गे धावणार आहे.

ट्रेन नंबर - 18048 वास्को द गामा - शालीमार कटक, साळगाव, अंगुल मार्गे वळवण्यात आली आहे.

ट्रेन नंबर - 22850 सिकंदराबाद-शालीमार साप्ताहिक ट्रेन कटक, साळगाव, अंगुल मार्गे वळवण्यात आली आहे.

रद्द झालेल्या ट्रेनची यादी -

ट्रेन नंबर - 12839 हावडा-चेन्नई सेंट्रल मेल

ट्रेन नंबर - 12863 हावडा-एसएमव्ही बंगळुरु एक्स्प्रेस

ट्रेन नंबर - 12895 - शालीमार- पुरी सुपरफास्ट एक्स्प्रेस

ट्रेन नंबर - 20831 - महिमा गोसाई एक्स्प्रेस

ट्रेन नंबर 12837 - हावड़ा पुरी सुपर फास्ट एक्स्प्रेस

ट्रेन नंबर 02837 - एसआरसी पुरी सुपर फास्ट एक्स्प्रेस

ट्रेन नंबर 12863 - हावडा-एसएमवी बँगलोर एक्स्प्रेस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

SCROLL FOR NEXT