Suspected RDX blast on freight train in Punjab Saam TV Marathi
देश विदेश

Train Blast: धक्कादायक! अर्ध्या रात्री RDX ने ट्रेन उडवण्याचा डाव, रेल्वे ट्रॅकवर भयंकर स्फोट, ट्रेन पटरी उद्ध्वस्त, इंजिन थोडक्यात....

Railway track destroyed after IED blast in Sirhind : पंजाबमधील सरहिंद (फत्तेगड साहिब) जिल्ह्यात मालगाडीच्या इंजिनखाली भीषण स्फोट झाला असून आरडीएक्स किंवा IED वापरण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Namdeo Kumbhar

Suspected RDX blast on freight train in Punjab : भारताच्या विविध शहरांमध्ये प्रजासत्ताक दिनी मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आलाय. मुंबई, पुण्यापासून दिल्ली अन् जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी केलाय. पंजाबमध्ये अर्ध्या रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. RDX ने रेल्वे रूळ आणि मालगाडी उडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या स्फोटाचा कसून तपास केला जात आहे.

इंजिनाच्या खाली भयंकर स्फोट झाला. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना झाली नाही. या स्फोटात मालगाडीच्या इंजिनचे नुकसान झाले असून प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे. पंजाबच्या फत्तेगड साहिब (सरहिंद) जिल्ह्यात मालगाडीच्या इंजिनखाली भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की त्यामुळे रेल्वे ट्रॅकचे तुकडे झाले. या स्फोटात ट्रेन चालक जखमी झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यासाठी आयईडी (IED) अथवा RDX यासारख्या घातक स्फोटकांचा वापर केल्याचा संशय गुप्तचर संस्थेने व्यक्त केला आहे. स्फोट इतका भीषण होता की मालगाडीच्या इंजिनच्या भागाचे नुकसान झाले. पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्फोटाची माहिती मिळताच रेल्वे पोलीस, स्थानिक पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. हा घातपाताचा प्रयत्न होता का? याचा कसून तपास पोलीस आणि गुप्तचर विभागाकडून केला जात आहे.

शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या आसपास रेल्वे रूळावर स्फोट झाल्याची माहिती समोर आली. पंजाबमधील सरहिंदमधील खानपूर गेटजवळ नवीन रेल्वे मार्गावरून ही मालगाडी जात होती. इंजिन गेटजवळ येताच मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की ट्रॅकचा ४ फूट भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. रेल्वे रूळावर झालेल्या या स्फोटात मालगाडीच्या इंजिनचे मोठे नुकसान झालेय. इंजिनच्या खालीच स्फोट झाल्याने चालक गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरलेय. मिडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांच्या सुरुवातीच्या अहवालात हा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगितले जात आहे, पण अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zilla Parishad Election: राज्यात भाजपचा धमाका! ZP निवडणुकीआधीच उडवला विजयाचा बार, कोकणात १० जण बिनविरोध, विरोधकांना मोठा धक्का

Maharashtra Live News Update: चंद्रपूर मनपात सत्ता स्थापनेत एक नवा ट्विस्ट

Dog Attack: कुत्र्यांची टोळी अंगावर धावली तर काय कराल? दुचाकी चालकांनी ही माहिती वाचाच

Hair Care: आठवड्यातून २ वेळा हे तेल नक्की लावा; केस गळणे, कोंडा, फ्रिझी केस यांसारखे त्रास होतील कायमचे बंद

प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचे अवघ्या 26 व्या वर्षी निधन, फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT