Crime AI
देश विदेश

Shocking News: प्रेमाचा असाही अंत! वहिनी दीराच्या प्रेमात अखंड बुडाली, पण शेवटी विष प्राशन करून..

Love story turns fatal Bihar News: प्रेमप्रकरणातून वहिनी आणि दीरानं टोकाचे पाऊल उचलले आहे. विष प्राशन करून दोघांनी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला.

Bhagyashree Kamble

प्रेमप्रकरणातून वहिनी आणि दीरानं टोकाचे पाऊल उचलले आहे. विष प्राशन करून दोघांनी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. यात वहिनीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला तर, दीराचा देखील मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही धक्कादायक घटना बिहारमधील वैशाली जिल्ह्यात घडली आहे. या घटनेची सध्या परिसरात चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय नवविवाहित महिला आपल्या शेजारी राहणाऱ्या दीराच्या प्रेमात पडली. दीराचे वय २१ आहे. दोघांमध्ये नेहमी बोलणं व्हायचं. दोघांमधला संवाद आणि भेटीगाठी वाढल्या. दोघांमध्ये प्रेमसंबंध वाढले. याची माहिती कुटुंबातील सदस्यांना मिळाली, त्यांनी या नात्याला विरोध केला.

बुधवारी सकाळी दोघेही घरात दिसले नाही. सायंकाळी महनार पोलिस ठाण्यात याबद्दलची माहिती देण्यात आली. त्यानंतर गावात एक महिला विष प्राशन करून बेशुद्ध अवस्थेत आढळली होती. पोलिसांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

त्याचवेळी दीरानेही विष प्राशन केले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दीराचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

यासंदर्भात स्टेशन प्रभारी रामनिवास कुमार म्हणाले, मृताच्या कुटुंबाची चौकशी करण्यात येणार आहे. महिसौर पोलीस ठाण्यात कुटुंबाचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. कुटुंबाची चौकशी आणि घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT