Crime Saam
देश विदेश

Tragic Love: शिक्षक अन् विद्यार्थिनी OYO मध्ये गेले, १० तास बाहेर आलेच नाही, दरवाजा तोडताच दोघेही बेडवर..

Teacher and Student Killed Themselves in Aligarh Hotel: ओयो हॉटेलमध्ये शिक्षक आणि विद्यार्थिनीने विष प्राशन करून आयुष्य संपवले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ माजली आहे.

Bhagyashree Kamble

शिक्षक आणि विद्यार्थिनीने ओयो हॉटेलमध्ये जाऊन आयुष्य संपवलं आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये घडली आहे. शिक्षक आणि तरूणी एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले होते. त्यांनी हॉटेलमध्ये जाऊन विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. त्या दोघांनी आत्महत्या का केली? याचे अद्याप कारण समोर आले नसून, या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

चंद्रभान कुमार (वय वर्ष २४) असे शिक्षकाचे नाव आहे. तर, विद्यार्थिनीचे नाव अद्याप समोर आलेले नाही. दोघेही उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील रहिवासी. चंद्रभान खासगी शाळेतील शिक्षक होता. तर, विद्यार्थिनी त्याच शाळेत नववीच्या वर्गात शिकत होती.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रभान आणि विद्यार्थिनी सोमवारी सकाळी ८.४० च्या सुमारास ओयो हॉटेलमध्ये पोहोचले होते. त्यांनी ओळखपत्र दाखवून २०४ क्रमांकाची खोली घेतली. मात्र, १० तास उलटल्यानंतरही दोघे बाहेर आले नाहीत.

त्यामुळे हॉटेल कर्मचाऱ्यांना संशय आल्यावर त्यांनी डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला. आत दोघांचे मृतदेह बेडवर आढळले. कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. डुप्लिकेट चावीने खोलीचा दरवाजा उघडल्यानंतर बेडवर दोघांचे मृतदेह आढळला. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेत रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. दोघांनी विष प्राशन करून आत्महत्या केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांनी खोलीची चौकशी केली असता, मुलीचे आधार कार्ड बनावट असल्याचं आढळून आलंय. यासंदर्भात एएसपी मयंक पाठक म्हणाले, शिक्षक चंद्रभान आणि विद्यार्थिनीमध्ये प्रेमसंबंध होते. दोघांनी विष प्राशन करून आत्महत्या केली असल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी पोलीस मालक आणि कुटुंबाची चौकशी करणार आहेत. दोघांनी आत्महत्या का केली? याचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सकाळी नाश्ता बनवायला वेळ मिळत नाही? मग फक्त एकदाच करा तयारी; आठवडाभर नाश्त्याची चिंता मिटेल

Pahadi Masala Chai Recipe : पावसाळ्यात बनवा फक्कड पहाडी मसाला चहा, एक घोट पिताच थंडी जाईल पळून

Maharashtra News Live Update: संतोष देशमुख हत्या प्रकरणाची अत्यंत महत्त्वाची विशेष सुनावणी

High Cholesterol: दररोज सकाळी रिकाम्या पोटी खा या 5 बिया; नसांमधील खराब कोलेस्ट्रॉल झटक्यात वितळेल

Pune Tourism : पावसाळ्यात धबधबा पाहण्याचा आनंद काही औरच! पुण्यात लपलाय 'हा' निसर्गाचा अद्भुत चमत्कार

SCROLL FOR NEXT